अखेर प्रतिक्षा संपली... कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 7, 2022

अखेर प्रतिक्षा संपली... कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी.

 अखेर प्रतिक्षा संपली... कल्याण रोड परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी.

25 मार्चला पाण्याच्या टाकीत पिण्याचे पाणी सोडणार - महापौर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः कल्याण रोड परिसरातील अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न सुटणार असून 25 मार्च रोजी कल्याण रोड परिसरातील उंच पाण्याच्या टाकीत पाणी सोडण्यात येणार असून या परिसरातील नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनाला आता यश आले आहे. 10 ते 12 दिवसातून पाणी येण्याची वाट पाहणार्‍या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी आज महापौर कार्यालयात बैठक घेऊन कल्याण रोड परिसरातील नागरिकांना आता पिण्याचे पाणी मोठ्या प्रमाणात मिळेल असा विश्वास व्यक्त केला. या बैठकीला मा.आयुक्त शंकर गोरे, नगरसेवक अनिल शिंदे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, विजय पठारे, संजय शेंडगे, अनिल बोरुडे, दत्ता जाधव, गिते, अभियंता आर जी सातपुते, गणेश गाडळकर आदि उपस्थित होते.
याप्रसंगी महापौर म्हणाल्या की, कल्याण रोड परिसरात पिण्याचे पाणी 10-12 दिवसांनी येत आहे. नागरिकांना पिण्याच्या पाणी दिवसाआड मिळावे यासाठी उंच टाकीचे काम करण्यात आले. उंच टाकीत पाणी जाण्यासाठी संपवेलचे काम करण्यात आले. यासाठी आवश्यक असणारे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून पंप हाऊसचे काम देखील झालेले आहे. विद्युत मोटारी बसविण्याचे काम येत्या दोन दिवसांत पूर्ण होवून टाकीची चाचणी घेण्यात येणार आहे. त्यानंतर उंच टाकीमध्ये संपवेलमधील पाणी सोडण्यात येवून या उंच टाकीतून कल्याण रोडच्या संपूर्ण परिसरात दि 25 मार्च रोजी पिण्याचे पाणी सोडण्यात येणारआहे. याबाबत मा.आयुक्त व संबंधित विभाग प्रमुख व अभियंता यांच्याशी प्रभागातील सर्व नगरसेवकांसमवेत चर्चा झाली असून कल्याण रोड परिसराला दि 25 मार्च पासून पिण्याचे पाणी देण्याचे निश्चित करण्यात आले आहे त्यामुळे या परिसरातील अनेक वर्षापासूनचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत होईल. यासाठी प्रभाग क्र. 8 व 15 मधील नगरसेवकांनी वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यामुळेच हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. असेही त्या म्हणाल्या.

No comments:

Post a Comment