इंग्रजी अधिकारी प्रवरा कारखान्यावर विखे पितापुत्रांनी का बसविला? - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 30, 2022

इंग्रजी अधिकारी प्रवरा कारखान्यावर विखे पितापुत्रांनी का बसविला?

 इंग्रजी अधिकारी प्रवरा कारखान्यावर विखे पितापुत्रांनी का बसविला?

भाजप का करतेय विखे पिता पुत्रांच्या आर्थिक घोटाळ्याकडे दुर्लक्ष? ः शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांचा सवाल.

विखे यांच्या मुली जावया सोबत विविध कंपन्यात भागीदार
 यु के तील दिवाळखोर जिमी ओल्सन अडचणीत असलेल्या
 प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे अघोषित व्यवस्थापकीय संचालक आहेत का?


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः यु के स्थित जिमी ओल्सन हे सध्या भारतात आले आहेत. ते तेथील रियल इस्टेट क्षेत्रातील व्यावसायिक होते. पण काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना तेथील आपल्या व्यवसायाचे चंबू गबाळ त्यांना आवरावे लागले आणि आता सध्या ते लोणी येथे आहेत. येथील प्रवरा सहकारी साखर कारखाना विखे यांनी त्यांच्या ताब्यात दिला आहे. हा कारखाना सध्या प्रचंड आर्थिक अडचणीत आहे .पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सामान्य गोरगरीब शेतकरी वर्गाला सोबत घेऊन त्यांच्या आर्थिक उद्धारासाठी या आशिया खंडातील पहिल्या सहकारी तत्त्वावरील साखर कारखान्याची मुहूर्तमेढ रोवली. पण आता विखे हे हा मूळ उद्देशच धुळीला मिळवत एक इंग्रज अधिकारी या कारखान्यावर आणून बसविला आहे. तो या कारखान्याच्या दैनंदिन व्यवहारावर लक्ष ठेवत कामगारांचे व्यवस्थापन पाहत आहे. या द्वारे विखे याना हा कारखाना खाजगीत मोडीत काढून हा कारखाना ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात द्यायचा आहे का युरोप मध्ये आपल्या व्यवसायाचा गाशा गुंडाळून भारतात ते ही थेट लोणी येथील विखे यांच्या प्रवरा सहकारी साखर कारखान्यात व्यवस्थापकीय संचालक असल्याच्या तोर्‍यात फिरणारे जिमी ओल्सन तिथे काय करीत आहेत ? प्रवरा वीज सोसायटी नंतर, नाशिकची पदमश्री विठ्ठलराव विखे पाटील बँक तसेच विखे यांच्या ताब्यातील सर्व कारखाने प्रचंड आर्थिक अडचणीत आलेले असतांना विखे यांचे आर्थिक घोटाळे भाजप का दुर्लक्षित करीत आहे, असे अनेक प्रश्न शिवसेनेचे नगर उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी उपस्थित केले आहेत.
सध्या सुरु असलेल्या शिवसेना भाजपच्या आरोप प्रत्यारोपाच्या युद्धात असे अनेक प्रश्न अर्थाअर्थी काहीच संबंध नसतांना उगाचच भडक वक्तवे करून भाजपातील वरिष्ठांचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्न करणार्‍या विखे पिता पुत्रावर शिवसेनेचे जाधव यांनी जिमी ओल्सन चे प्रकरण काढून पलटवार केला आहे. याबाबत चे पत्रक त्यांनी काढले आहे. तसेच जिमीचा विखे परिवाराशी कसा घनिष्ठ आर्थिक संबंध आहे याचे पुरावे त्यांनी दिले आहेत. जिमी ओल्सन आणि विखे परिवाराचे घनिष्ठ आर्थिक संबंध असावेत कारण जिमी हे यु के तील आल्दिया कॅपिटल या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर असून त्यांनी भारतात विखे परिवाराशी संबंधित आल्दिया ऍडव्हायझरी प्रायव्हेट लिमिटेड, गो फ्रेश फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड, प्रवरा बायो एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, सी एल इन्फ्रा लिमिटेड, गो फ्रेश फूड पार्क प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांसोबत त्यांची भागीदारी आहे. आता हे व्यवहारीक संबंध का व कशासाठी हा प्रश्न जेव्हा इन्कम टॅक्स, ई डी किंवा तत्सम यंत्रणेकडे तपासासाठी जाईल तेव्हा उजेडात येईल. परंतु अगोदरच विखे यांच्या ताब्यात असलेले तिनही कारखाने प्रचंड घोटाळ्यामुळे आणि अनियमित कारभारामुळे अडचणीत सापडले आहेत. त्यासोबत नाशिक येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी बँक नगर अर्बन बँकेप्रमाणे आर्थिक घोटाळ्यात अडकली आहे. रिझर्व्ह बँक यावर अर्बन प्रमाणेच निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. पण आर बी आय केंद्राच्या अखत्यारीत येत असल्याने कदाचित विखे यांना आर बी आय बाय देत असावी. ज्या राज्यात आपली सत्ता नाही तेथील सत्ताधारी पक्षांच्या मागे आय टी , ई डी सारख्या संस्थांच्या चौकशीचा ससेमिरा लावणार्‍या भाजपाच्या राज्यातील नेत्यांना विखेंच्या बुडाखाली असलेला अंधार दिसत नाही का? असा सवाल गिरीश जाधव यांनी उपस्थित केला आहे.
विखे यांच्या प्रवरा शिक्षण संस्थेत कसा गैरकारभार सुरु आहे. तसेच डॉ. झाकीर नाईक या दहशदवादाचे समर्थन करणार्‍या आणि देशात बंदी असलेल्या संस्थेमार्फत प्रवराने जे डोनेशन घेतले आहे. याबाबत त्यांचेच जेष्ठ बंधू डॉ. अशोकराव विखे हे सर्व सरकारी कार्यालयात अर्ज विनंत्या करून थकले तरी भाजप व संघाला  हा विखे यांचा भ्रष्ट कारभार कसा चालतो असा खरा प्रश्न आहे.

No comments:

Post a Comment