जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी इंटेग्रिटीच्यावतीने बहिरवाडी येथे ‘उत्सव स्त्रित्वाचा’ साजरा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी इंटेग्रिटीच्यावतीने बहिरवाडी येथे ‘उत्सव स्त्रित्वाचा’ साजरा

 जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी इंटेग्रिटीच्यावतीने बहिरवाडी येथे ‘उत्सव स्त्रित्वाचा’ साजरा.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
अहमदनगर ः
आज ग्रामीण भागातील महिला व्यवसाय करतात परंतू त्यांना त्यांच्या वस्तूचे  योग्य मार्केटींग करण्यामध्ये त्या कमी पडतात. आपल्या आजूबाजूला अनेक गोष्टीतून आज विविध वस्तुचा व्यवसाय करता येतो फक्त आपण सातत्याने निरीक्षण करायला हवे, असे प्रतिपादन श्री हेमंत लोहगांवकर यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ इंटेग्रिटीच्या वतीने उत्सव स्त्रित्वाचा” अंतर्गत बहिरवाडी येथे महिलांकरिता पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यावेळी माय टिफीनचे हेमंत लोहगांवकर यांचे  व्यवसाय पहावा करून  तसेच स्त्रीरोगतज्ञ डॉ. सोनाली वहाडणे यांचे  महिला आणि आरोग्य  या विषयावर मार्गदर्शनही करण्यात आले.
डॉ.सोनाली वहाडणे म्हणाल्या की, आजच्या धकाधकीच्या जीवनात स्त्री स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत घरातील प्रत्येकांची काळजी घेते.  यावेळी डॉ.वहाडणे यांनी मासीक पाळी,गरोदर स्त्रियांनी घ्यावयाची काळजी, महिलांनी कोणता पोष्टिक आहार करावा, तसेच योग्य व्यायामाबाबत माहीती दिली. सकारात्मक विचार करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी क्लबचे अध्यक्ष रो. सुयोग झंवर , रो. चंदना गांधी, रो. रवी डिक्रूज, रो.शुभश्री पटनाइक, रो.निखिल कुलकर्णी ,नित्यम वेलनेसचे सौ. निकिता रसाळ, सरपंच  अंजली येवले, तलाठी सरिता मुंढे , मंडळाधिकारी वृषाली करोसिया आदी मान्यवर उपस्थित होते.
पाककला स्पर्धेचे परीक्षण श्री हेमंत लोहगांवकर, डॉ. सोनाली वहाडणे व नित्यम वेलनेसचे सौ. निकिता रसाळ यांनी केले.
पाककला स्पर्धेचा निकाल ः प्रथम क्रंमाक शितल दारकुंडे, व्दितीय क्रंमाक जयश्री दारकुंडे, तृतीय क्रंमाक  कोमल दारकुंडे.
सरपंच सौ.अंजलीताई येवले यांनीही मनोगत व्यक्त करताना रोटरी क्लबचे अभिनंदन व कौतुक केले. प्रास्ताविक  क्लबचे अध्यक्ष सुयोग झंवर यांनी केले. सूत्रसंचालन राजू दारकुंडे यांनी केले तर आभार  रो. रवी डिक्रूज  यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रो.चंदना गांधी व रो. रवि डिक्रूज यांनी मेहनत घेतली.
यावेळी उपसरपंच मधुकर पाटोळे , ग्रामपंचायत सदस्य राजू दारकुंडे,सावळेराम चव्हाण, कांता दारकुंडे, अलका काळे,सुनिता जरे, ग्रामसवेक योगेश साबळे, कृषी अधिकारी धनराज गुंड,सामाजिक कार्यकर्ते संजय येवले,गणपत वाघ,सागर  दारकुंडे, अंगणवाडी सेविका, आशासेविका,प्राथमिक शिक्षक, महिला बचतगट, विविध खात्याचे अधिकारी, महिला, ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment