न्यू. आर्ट्स महाविद्यलयाचा विद्यार्थी मयुर जपे याची राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी निवड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, March 12, 2022

न्यू. आर्ट्स महाविद्यलयाचा विद्यार्थी मयुर जपे याची राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी निवड

 न्यू. आर्ट्स महाविद्यलयाचा विद्यार्थी मयुर जपे याची राष्ट्रीय जुदो स्पर्धेसाठी निवड


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नाशिक येथे पार पडलेल्या सा.फु. पुणे विद्यापीठाच्या आंतर विभागीय जुदो स्पर्धेत न्यू आर्टस्,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगर या महाविद्यालयाचा खेळाडू मयुर जपे (टी.वाय.बीए) याने_ नासिक विभाग,पुणे शहर, पुणे जिल्हा या खेळाडूं चा पराभव करत नेत्रदीपक कामगिरी करून सुवर्ण पदक पटकाविले. मयुर जपे याची पुणे विद्यापीठाच्या संघात अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी कानपुर विद्यापीठ (यु.पी) येथे निवड झाली आहे. या स्पर्धा 21मार्च ते 25 मार्च 2022 रोजी संपन्न होणार आहेत.
या यशाचे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेचे अध्यक्ष मा.आ. नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे साहेब, सचिव जी.डी. खानदेशे साहेब, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार, डॉ विवेक भापकर, तसेच संस्थेचे सर्व विश्वस्त, सदस्य, व सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच. झावरे, कला शाखेचे उपप्राचार्य डॉ बाळासाहेब सागडे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ संजय कळमकर, विज्ञान शाखेचे डॉ. अनिल आठरे, प्रबंधक बी.के.साबळे, ओएस, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, यांनी अभिनंदन केले.या खेळाडूंना जिमखाना विभाग प्रमुख डॉ शरद मगर,प्रा धन्याकुमार हराळ, प्रा सुधाकर सुंभे प्रा धनंजय लाटे, प्रा आकाश नढे अप्पा गोडलकर, अप्पासाहेब दाते, तुषार चौरे सर्वांचे मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here