कोल्हेवाडी वि. का. सेवा सह. सोसायटीवर भाजपचा झेंडा... - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 14, 2022

कोल्हेवाडी वि. का. सेवा सह. सोसायटीवर भाजपचा झेंडा...

 कोल्हेवाडी वि. का. सेवा सह. सोसायटीवर भाजपचा झेंडा... 


जामखेड - 
साकत जामखेड तालुक्यात सध्या सोसायटी निवडणूकांचे वारे वाहत आहे , दि.13 फेब्रुवारी रोजी झालेल्या कोल्हेवाडी सोसायटी वर भाजपाने मा.सभापती डॉ.भगवान दादा मुरूमकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनल चा धुव्वा उडवला आहे, मा . सभापती भगवान दादा मुरूमकर यांचा सहकार पॅनल हा बहुमताने पूर्ण तेरा उमेदवारांचा पॅनलच निवडून आला आहे. सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांसाठी सोसायटीची निवडणूक यावेळी समोरासमोर लढत झाल्यामुळे प्रतिष्टेची ठरली होती, परंतु सर्वसामान्य जनतेने पुन्हा डॉ.भगवान दादा मुरूमकर यांच्या पाठीमागे कौल दिला आहे. सहकार पॅनलचे निवडून आलेले १३ उमेदवार - कडभने साहेबराव धोंडिराम ,कोल्हे गुलाब धर्मा ,कोल्हे मच्छीद्र जयसिंग , सुभाष रामभाऊ कोल्हे (मुकादम) , कोल्हे सुदाम भगवान ,कोल्हे लक्ष्मण नाना , नेमाने रामहरी दत्तु , सरोदे लक्ष्मण अहिलाजी , कोल्हे दुर्गाबाई गोकुळ , कोल्हे कलावती जालिंदर , कोल्हे मोहन लक्ष्मण , दिनकर घोडेस्वार , गवळी भगवान धोंडिबा यांची संचालक पदी मताधिक्याने निवड झाली. पंचक्रोशीत सामान्य व्यक्तीचा विजय झाल्यामुळे एकच जल्लोष करण्यात आला.

No comments:

Post a Comment