शिवाजीनगर मधील बालाजी मंदिरात बाह्य संपर्क आरोग्य शिबीर संपन्न. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 23, 2022

शिवाजीनगर मधील बालाजी मंदिरात बाह्य संपर्क आरोग्य शिबीर संपन्न.

 शिवाजीनगर मधील बालाजी मंदिरात बाह्य संपर्क आरोग्य शिबीर संपन्न.

नागरिकांनी आरोग्य शिबिरात सहभाग घ्यावा- शाम नळकांडे.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आपल्या आरोग्याची निगा राखणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य असून कोणत्या कारणाने आपले आरोग्य बिघडले याची शहानिशा करून उपचार घेऊन आपले आरोग्य योग्य ठेवणे महत्त्वाचे आहे. अहमदनगर महानगरपालिका ,आरोग्य विभाग, महापौर, आयुक्त, उपायुक्त, व प्रभागातील नगरसेवक यांच्या प्रयत्नाने प्रभागात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागरिकांनी आरोग्य शिबिरात सहभाग घ्यावा असे प्रतिपादन नगरसेवक शाम नळकांडे यांनी केले आहे.
तोफखाना नागरी आरोग्य केंद्र अंतर्गत अहमदनगर महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील शिवाजीनगर परिसरातील बालाजी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बाह्य संपर्क आरोग्य शिबिरात ते बोलत होते.
श्री. नळकांडे पुढे म्हणाले की, कोव्हीड काळात मनपा प्रशासनाने प्रभागातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्रे सुरू करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. मनपा आरोग्य विभाग, आयुक्त, महापौर यांचे अशा उपक्रमांसाठी नेहमीच सहकार्य लाभत असल्याचेही ते म्हणाले. या शिबिरांमध्ये गरोदर माता, स्तनदा माता, किशोरवयीन मुले व मुली, महिला, वृद्ध, यांच्याकरिता मोफत आरोग्य तपासणी तज्ञ डॉक्टर मार्फत करून औषधे वाटप तसेच आवश्यकतेनुसार रक्त लघवी, लॅबोरेटरी तपासणी मोफत करण्यात आली. या शिबीरात 300 ते 350 नागरीकांनी सहभाग नोेंदवीला  याप्रसंगी नगरसेवक शाम नळकांडे नगरसेवक सचिन शिंदे  डॉ.आरती कापसे (वैद्यकीय अधिकारी तोफखाना दवाखाना), डॉ.गौरव हराळ, डॉ.स्वाती हराळ (फिजिशियन), डॉ.गीते अनिरुद्ध (बालरोग तज्ञ), सि.वर्षा कोल्हे, सि.रोहिणी सानप, सि.कोलवते, सि.शिंगाडे, सि.तेजल कदम (फार्मासिस्ट) ई.मान्यवर उपस्थित होते.

No comments:

Post a Comment