रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 19, 2022

रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.

 रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करा : सभापती दाते.


पारनेर - 
खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण कल्याण समितीची मीटिंग जिल्हा परिषदेचे बांधकाम व कृषी समिती सभापती काशिनाथ दाते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी बोलताना सभापती दाते म्हणाले प्राथमिक आरोग्य केंद्र खडकवाडी येथे प्राथमिक गरजा असलेले पाणी फिल्टर मशीन, साफसफाई साठी लागणारे साहित्य, रुग्णांना लागणारे मेडिसीन तसेच डिलेवरी झाल्यानंतर लहान बाळांना उदार कपडे देण्याच्या सुचना करुन यावरती ताबडतोब खर्च करून रुग्णांची हेळसांड होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना सभापती दाते यांनी दिल्या. आरोग्य केंद्राचा आढावा घेताना मागील वर्षी जवळपास जिल्ह्यात सर्वात जास्त ११७ डिलेवरी खडकवाडी आरोग्य केंद्र झाले असून चालू वर्षातही ९५ डिलिव्हरी या केंद्रात झालेले आहेत खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा परिसर हा आदिवासी ठाकर,भिल्ल,आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांचा असून या आरोग्य केंद्राने अतिशय चांगली सुविधा रुग्णांना उपलब्ध करून दिल्या आहे तसेच खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचा विस्तार करणे करीता ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला असून तसेच आरोग्य केंद्राच्या दुरुस्ती करीताही १५ लक्ष रुपयांचा निधी दिलेला आहे असा ६५ लक्ष रुपयांचा निधी मंजूर असुन लवकरच त्याचे निविदा प्रक्रिया होऊन काम सुरू करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली सभापती दाते यांनी दिली.
यावेळी १२ ते १४ वयोगटातील मुलांना १७४० कोरूना प्रतिबंधक लस उपलब्ध झालेल्या असून सोमवारपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या शाळांमध्ये मुलांचे लसीकरण करण्यात येणार असून वयोगटानुसार आरोग्य केंद्रांमध्येही लसीकरण सुरू असल्याची माहिती सभापती दाते सर यांनी दिली खडकवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिक्त असलेले लॅब टेक्नीशियन, आरोग्य सेविका, जी एन एम हे पद रिक्त असून ते लवकरात लवकर भरण्यात यावे याकरिता जिल्हा परिषदेला ठराव पाठवण्यात आला.
यावेळी डॉक्टर राहुल सानप, डॉक्टर अन्विता भांगे, खडकवाडी सरपंच शोभा शिंदे, धनंजय ढोकळे, प्रसाद कर्नावट, तुषार साळवे, लहानुबाई ढोकळे, अण्णा शिंदे, औषध निर्माण अधिकारी स्वाती ठुबे, क्लार्क अरुण गोरडे,एच.एम. बनसोडे, दत्तात्रय काळे, अनिल हिंगडे, रामचंद्र पालवे इत्यादी समिती सदस्य व कर्मचारी उपस्थित होते प्रोसिडिंग चे वाचन क्लार्क अरुण गोरडे यांनी केले समारोप स्वाती ठुबे यांनी केला.

No comments:

Post a Comment