आ.निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नगरसेवक मुंबई दरबारी ! - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, March 14, 2022

आ.निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नगरसेवक मुंबई दरबारी !

 आ.निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीचे नगरसेवक मुंबई दरबारी !

पारनेर शहरातील विविध प्रलंबित प्रश्‍न लागणार मार्गी !

विकासात्मक विविध प्रश्नांवर झाली सकारात्मक चर्चा !


पारनेर -
पारनेर गावची ग्रामपंचायतचे रूपांतर नगरपंचायत मध्ये झाले पारनेर गाव शहर झाले . परंतु गेले सहा वर्षापासून पारनेर नगरपंचायतच्या माध्यमातुन कुठलंही शाश्वत विकासाचे काम पूर्ण झाले नाही . आमदार निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पारनेर नगरपंचायतीचे राष्ट्रवादीचे नगराअध्यक्ष विजयराव सदाशीव औटी यांच्या नेतृत्वाखाली तसेच  व सर्व नगरसेवक यांनी पारनेर शहराचा विकास आराखड्या सह विविध प्रलंबित प्रश्नांसाठी व पायाभूत विकासासाठी
पारनेर शहर पाणी योजने बाबत शासन स्तरावर पाठपुरावा करत सदर पारनेर पाणी योजनेस आमदार निलेशजी लंके साहेब यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत तसेच पारनेर नगरपंचायतच्या माध्यमातून सर्व प्रशासकीय पाठपुरावा करत नगर पंचायतचे राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक सोमवारी मुंबई येथे संबंधीत खात्याच्या मंत्री व अधिकारी वर्गाला भेटत सकारात्मक चर्चा केली .
        पारनेर शहर हे दुष्काळी भागा मध्ये मोडत असून शहरात कुठलाही शाश्‍वत पाण्याची सोय नाही साधारणपणे प्रत्येक वर्षी एप्रिल ते जून हे तीन महिने टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो .ज्यामध्ये शासनाच्या निधीचा अपव्यय होतो. पारनेर शहराची प्रस्तावित पाणी योजना व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच एलईडी पथदिवे बसविणे व दुरुस्ती संदर्भात निर्णय नगर विकास आराखडा करणे बाबत तसेच पारनेर नगर पंचायत २०१५ साली सुरू झाली असून पारनेर शहर अतिशय दुष्काळी भागात मोडते शहराचा पाणी योजना शहरी व्यवस्थापन तसेच शहराचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी शहर विकास आराखडा होणे गरजेचे आहे . परंतु शहर विकास आराखडा लवकरात लवकर होण्यासाठी आपल्या स्तरावर व्यक्ती निर्देश देऊन शहर विकास आराखडा तयार करण्याबाबत सूचना व संबंधीत अधिकारी नेमणूक करावी तसेच पारनेर नगर पंचायत आर्थिक दृष्ट्या सक्षम नसल्याने शासनस्तरावरचे मानधन देणे कामी कारवाई व्हावी अशा प्रकारचे निवेदन नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना देण्यात आले .तसेच शहरातील बारा ज्योतिर्लिंग ग्राम दैवत नागेश्वर देवस्थान व तीर्थक्षेत्र विकास ५ समावेश होणेबाबत राज्यमंत्री उद्योग खनिकर्म पर्यटन क्रीडा व युवक कल्याण महाराष्ट्र राज्य मंत्री अदितीताई तटकारे  यांच्या कार्यालयात पाठपुरावा करत . पारनेर लवकरच अनेक प्रश्न मार्गी लागतील असे नगराध्यक्ष विजय औटी यांनी सांगीतले .
        या वेळी नगराध्यक्ष विजय औटी यांच्या सह राष्ट्रवादी उपजिल्हाध्यक्ष अर्जुन भालेकर, डॉक्टर कावरे , अशोक चेडे ,भूषण शेलार , डॉक्टर सचिन औटी , बाळासाहेब नगरे , योगेश मते, नितीन अडसूळ , विजय भा. औटी ,श्रीकांत चौरे यांची संपुर्ण टिम मुंबई दरबारी दाखल झाली व नगर विकास अपर मुख्य सचिव नगर विकास विभाग १ चे भुषण गगराणी यांचेकडे नगर विकास खात्यातील विवीध प्रश्नावर सकारात्मक चर्चा करत व पारनेर शहराच्या विवीध विकास कामा बद्दल आ. निलेशजी लंके साहेब नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व सभापती व नगरसेवक या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment