न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये नेट-सेट गाईडन्स इन फिजीकल सायन्स या विषयावर कार्यशाळा संपन्न … - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये नेट-सेट गाईडन्स इन फिजीकल सायन्स या विषयावर कार्यशाळा संपन्न …

 न्यू आर्ट्स महाविद्यालयामध्ये नेट-सेट गाईडन्स इन फिजीकल सायन्स या विषयावर कार्यशाळा संपन्न …'


पारनेर -
पारनेर येथील न्यू आर्ट्स कॉमर्स & सायन्स महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभाग व आय . क्यू ए सी . विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “ नेट-सेट गाईडन्स इन फिजीकल सायन्स “ या विषयावर  गुरुवार दिनांक ०३/०२ /२०२२ रोजी एक दिवसीय राष्ट्रीयस्तराच्या  कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कार्यशाळेचे व्याख्याते रामनारायण रुईया कॉलेज मधील भौतिकशास्त्र विभागचे सहाय्यक प्राध्यापक मा.श्री ओंकार रामदेसी यांनी  नेट-सेट गाईडन्स इन फिजीकल सायन्स या विषयावर मार्गदर्शन केले.
 सरांनी आपल्या व्याख्यानात, नेट- सेट  परीक्षांसाठी आसनारे पात्रता निकष, अभ्यासक्रम आणि गुणांकन योजना यांचे तपशीलवार विश्लेषण केले.सरांनी सहभागी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी लागणारे  पुस्तके, त्यांनी कोणत्या मुद्दाकंडे लक्ष केंद्रित केले पाहिजे याबद्दल तसेच  भौतिकशास्त्रमधील  करिअर संधींबद्दल माहिती दिली. शेवटी, जोपर्यंत तुम्ही स्वतःला प्रेरित करत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला प्रेरित करू शकत नाही असे सांगून सहभागी विदयार्थीना  मार्गदर्शन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के आहेर सरांनी सहभागी विद्यार्थ्यांचे व व्याख्यातांचे स्वागत करुन कार्यशाळेस शुभेच्छा दिल्या.कार्यशाळेचे प्रास्तातविक  व  व्याख्यातांचा परिचय कार्यशाळेचे समन्वयक प्रा .एन. ए पवार यांनी केला.या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे उप प्राचार्य व आय . क्यू ए सी .  समन्वयक प्रा डॉ डी.आर ठुबे, भौतिकशास्राचे विभागप्रमुख प्रा डॉ एस.एल कदम, प्रा डॉ श्रीम. व्ही.पी ढवळे , प्रा आर. बी खराडे,   प्रा .एन. ए पवार प्रा जी. एम रेपाळे, प्रा  व्ही बी शेरकर, प्रा. एम एस परजने, प्रा आर. जी कोरडे, प्रा पी एस मगर यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा .एन. ए पवार यांनी केले तर आभार रा डॉ श्रीम. व्ही.पी ढवळे यांनी मानले.

No comments:

Post a Comment