पदाधिकारी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम केल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास शक्य- सभापती राजश्रीताई मोरे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

पदाधिकारी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम केल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास शक्य- सभापती राजश्रीताई मोरे

 पदाधिकारी अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवून काम केल्यास तालुक्याचा सर्वांगीण विकास शक्य- सभापती राजश्रीताई मोरे


जामखेड  - 
पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम केल्यास तालुक्याचा गावांचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास पंचायत समिती जामखेड च्या सभापती राजश्रीताई मोरे यांनी व्यक्त केला. पंचायत समितीच्या वतीने आयोजित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांचा निरोप समारंभ कार्यक्रम व श्री नागनाथ शिंदे व श्री कैलास खैरे यांचा सत्कार कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंचायत समिती जामखेडच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांना यांचा निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. जिल्हा परिषदेच्या सदस्यांचा कार्यकाल 20 मार्च रोजी संपुष्टात येत आहे तसेच पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल 13 मार्च रोजी संपुष्टात येत आहे. या निमित्ताने पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सर्व अधिकारी कर्मचारी वर्गाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी सभापती राजश्री ताई मोरे, उपसभापती मनीषा सुरवसे, पंचायत समिती सदस्य डॉक्टर भगवानराव मुरूमकर, प्राध्यापक सुभाष आव्हाड , तसेच जिल्हा परिषद सदस्य वंदना ताई लोखंडे, सोमनाथ पाचरणे, सूर्यकांत मोरे, रवी सुरवसे, कर्जतचे जिल्हा परिषद सदस्य अशोक खेडकर, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे, सहाय्यक गटविकास अधिकारी दयानंद पवार, सी डी पी ओ बेलेकर मॅडम, गटशिक्षणाधिकारी कैलास खैरे उपस्थित होते. यावेळी बोलताना गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले की मागील काही दिवसात काम करत असताना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी प्रशासनाला सर्वतोपरी मदत केलेली आहे. त्यांच्या सहकार्यामुळे व मार्गदर्शनामुळेच प्रशासनाला अधिक चांगल्या पद्धतीने काम करता आले. घरकुल विभा,  रोजगार हमी विभाग अशा विभागांमध्ये जामखेड तालुक्यामध्ये अतिशय नाविन्यपूर्ण काम पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहेत. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य तसेच इतर मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री ज्ञानेश्वर कोळेकर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री अशोक शेळके यांनी केले.

No comments:

Post a Comment