चांद्यात दरोडेखोरांचा नंगानाच नागरिकांशी दरोडेखोरांची झटपट. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 2, 2022

चांद्यात दरोडेखोरांचा नंगानाच नागरिकांशी दरोडेखोरांची झटपट.

 चांद्यात दरोडेखोरांचा नंगानाच नागरिकांशी दरोडेखोरांची झटपट.

महिलेच्या अंगावरील दागिने लुटले, तीन नागरिक जखमी.


अहमदनगर -
चांदा परिसरातील लोहारवाडी रोड वरील कर्डिले वस्ती वर काल महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री 12 ते 1 च्या दरम्यान दरोडेखोरांनी अक्षरक्ष नंगानाच करत वस्तीवरील लोकांना अमानुषपणे मारहाण करीत महिलांच्या अंगावरील दागिने लुटले. वस्तीवरील लोक जागे झाल्यानंतर एका दरोडेखोराला पकडले पण त्याचे जोडीदाराने तीन नागरिकांवर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून घटनेची खबर समजताच सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन बागुल फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. आज सकाळी 9 वाजता जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटिल यांनी घटनास्थळी भेट दिली असून चोरीचा तपास लवकर लाविल अशी ग्वाही दिली.

यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत कर्डिले वस्ती वरील तीन जण जबर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या नगर येथील दवाखान्यात उपचार सुरू आहेत. जखमींमधील ओंकार गंगाधर कर्डिले याची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.
चांदा लोहारवाडी रोड वरील कर्डिले वस्ती या ठिकाणी काल महाशिवरात्रीच्या रात्री साधारण 12 ते 1 च्या दरम्यान चोरट्यांनी बापू भाऊसाहेब कर्डिले यांच्या वस्तीवर प्रवेश केला. तेथे अर्चना ताई कर्डिले व नर्मदा कर्डिले यांना दहशत करून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने पळवून नेले. यावेळी बापू कर्डिले त्यांचे चुलते गंगाधर नामदेव कर्डिले, सुभाष नामदेव कर्डिले, कर्डिले वस्तीवरील लोक जागे होऊन त्यांच्या पाठीमागे पळाले. शेजारीच कांद्याच्या शेतात त्यांनी एकाला पकडले. परंतु याच दरम्यान, पाठीमागून अंधारात लपून बसलेल्या त्यांच्या दुसर्‍या साथीदाराने त्यातील तिघांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांना गंभीर जखमी केले. आपली लोक जखमी झाल्याचे पाहून कर्डिले वस्ती वरील लोकांनी चोरट्याला सोडुन जखमींना तातडीने दवाखान्यात नेण्यासाठी प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

No comments:

Post a Comment