मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 2, 2022

मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.

 मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल.

राहता पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही...


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः 18 वर्षापेक्षा कमी वयांच्या मुलींचा विवाह करणे कायद्यानुसार गुन्हा असताना जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण चिंताजनक आहे. राहता तालुक्यातील सुकोरी मधील 15 वर्षे 8 महिने वय असणार्‍या मुलीचा बालविवाह चाईल्ड लाईनच्या टिमच्या मदतीने पोलिसांनी रोखून मुलीच्या आई-वडिलांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस लग्नाच्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत लग्न लागणार होते. पण पोलीस त्या ठिकाणी आल्याचे पाहून लग्नाच्या ठिकाणी गोंधळ उडाला. पण मुलीच्या घरच्या लोकांनी सुरुवातीला लग्न झालेच नाही, हा साखरपुडा होता, फोटोग्राफर नव्हता, फोटो मोबाईलमध्ये काढलेच नाही असा दावा करत फोटो देण्यास नकार दिला. धक्कादायक बाब म्हणजे मुलीचा जन्म दाखला, आधार कार्डही पालकांनी पोलिसांना दाखवले नाही. शेवटी पोलिसांनी मुलगी ज्या शाळेत शिकली त्या शाळेतून दाखला मिळवला तेव्हा त्या मुलीचे वय अवघे 15 वर्ष 8 महिने इतकेच होते.मुलीची आई -वडील, नवरदेव मुलगा, मुलाचे आई वडील या एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलीचे 18 वर्षापेक्षा कमी वय लक्षात घेता तिच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून या वयात लग्न होणे किवा असा निर्णय घेणे हा बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत दखलपात्र गुन्हा आहे.
एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार अशी माहिती चाईल्ड लाईन च्या 1098 या बालकांच्या हेल्पलाईनवर  माहिती मिळताच चाईल्ड लाईन सदस्यांनी ताबडतोब ही बाब पोलीस हेल्पलाईन 112 वर माहिती दिली, तसेच पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांना ही कंट्रोलकडून  माहिती मिळताच यासंदर्भात विलंब न करता ताबडतोब आपल्या पथकाच्या मदतीने आणि सुकोरी गावाचे ग्रामसेवक तथा बालविवाह प्रतिबंधक अधिकारी   यांनी धडाकेबाज कार्यवाही करत बालविवाह रोखून सदर प्रकरणातील आरोपींना सदर मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना सुद्धा तिच्याशी विवाह करण्याची तयारी दर्शवून विवाहाची तयारी केली होती म्हणून  सरकार तर्फे फिर्याद देत बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 11 प्रमाणे कायदेशीर फिर्याद देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत कलम 2 (14)(ुळळ) नुसार बालविवाह होत असलेली बालिका हि काळजी आणि संरक्षण अंतर्गत येते. तिचा बालविवाह पुन्हा होण्याची शक्यता असते, यामुळे  बालिकेस  बाल कल्याण समिती अ.नगर यांच्यासमोर हजर केले असता बाल कल्याण समितीने परिस्थितीचा विचार करून सदर मुलीला अहमदनगर येथील  शासकीय बालगृहामध्ये अल्पवयीन बालिकेस रवाना करण्यात आले आहे.
 कोरोना संकटाच्या काळात जिल्ह्यात बालविवाह वाढल्याची चर्चा सुरू आहे. शासकीय पातळीवर असे बालविवाह रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. पण तरीही अनेक ठिकाणी लपूनछपून तर काही ठिकाणी उघडपणे असे बालविवाह पार पाडले जात आहेत. आदिवासी पाडे, वैदू , पारधी, बंजारा तांड्यांमध्ये इतर अश्या भटक्या जमातीमध्ये बालविवाहाच्या बातम्या प्रकरणे आपण ऐकल्या आहेत.  
 जिल्ह्यातील बालविवाहांसंदर्भात सातत्याने वृत्तांकन करुन आणि  वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून चाईल्ड लाईन आणि स्नेहालय उडान बालविवाह प्रतिबंधक अभियानातर्गत जिल्ह्यात जनजागृती सुरू ठेवली आहे. यासंदर्भातले नियम काय आहेत आणि बालविवाह होत असेल तर एक जागरुक नागरिक म्हणून आपणही यासंदर्भातील माहिती चाईल्ड लाईनच्या मोफत हेल्पलाईन क्रमांक 1098 वर  देऊ शकता.आपले नाव गुपित ठेवले जाईल, अशी माहिती चाईल्ड लाईन टीम मेंबर आणि समन्वयक उडान, बालविवाह प्रतिबंधक अभियान अहमदनगरचे प्रवीण कदम यांनी कळवली आहे.

No comments:

Post a Comment