सर्व व्यवहार नियमाप्रमाणेच... मला कोर्टात न्याय मिळेल - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Wednesday, March 2, 2022

सर्व व्यवहार नियमाप्रमाणेच... मला कोर्टात न्याय मिळेल

 सर्व व्यवहार नियमाप्रमाणेच... मला कोर्टात न्याय मिळेल

‘ईडी’कारवाईप्रकरणी मंत्री तनपुरेंची प्रतिक्रिया


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नागपुरमधील राम गणेश गडकरी साखर कारखाना खरेदी व्यवहार प्रकरणी अत्यंत नियमात धरून व्यवहार केले गेले. याची जाहिरात दिली गेली त्यानुसार, टेंडर भरलं गेलं. त्यानंतर बंद पडलेला कारखाना सुरू करण्यात आला. यातून कामगारांना न्याय मिळाला. याप्रकरणी ईडीनं माझी चौकशी केली, त्यांच्या प्रश्नांना मी उत्तर दिली. पण मला कोर्टात न्याय मिळेल. चौकशीत यापुढे काही निष्पन्न होणार नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कानावरही ही बाब घालण्यात आली आहे,  अशी प्रतिक्रिया ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केली आहे.
दोन दिवसांपूर्वी ईडीनं  ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी या साखर कारखान्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई केली होतीयानंतर तनपुरे यांनी आज पहिल्यांदा यावर प्रतिक्रिया दिली आहे.दरम्यान, ईडीने प्राजक्त तनपुरे यांच्या दोन जमिनी जप्त केल्या. त्या जागांची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख इतकी आहे. एकूण 13 कोटी 41 लाख रूपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केली आहे. यामध्ये नागपूरमधील कारखान्याची 90 एकर जमीन आहे तर अहमदनगरमधील 4 एकर जमीनीचा समावेश आहे. तनपुरेंच्या कारखान्यावरील मालमत्ता जप्तीच्या कारवाईचा फटका काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनाही बसला आहे. राम गणेश गडकरी साखर कारखान्याची नागपूरमधली 90 एकर जमीन काँग्रेस नेते आशिष देशमुख यांच्या तक्षशिला सिक्युरिटीजने खरेदी केली होती. ईडीने ही संपत्तीसुद्धा जप्त केली आहे.

No comments:

Post a Comment