कापड बाजारातील व्यापार्‍यांकडून दुकाने बंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

कापड बाजारातील व्यापार्‍यांकडून दुकाने बंद.

 कापड बाजारातील व्यापार्‍यांकडून दुकाने बंद.

अतिक्रमणावरून वाद. शिवसेना बजरंग दलाचे ठिय्या आंदोलन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शहरातील कापड बाजारातील अतिक्रमणाचा विषय ऐरणीवर आला. एका दुकानासमोर हात गाडी लावण्यावरून हात गाडी चालक व दुकानदाराची बाचाबाची झाल्यामुळे व्यापार्‍यांनी बाजारपेठेतील वाढत्या अतिक्रमणामुळे कापड बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर शिवसेना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी व व्यापार्‍यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी उपायुक्त डांगे यांनी भेट घेऊन आंदोलनकर्त्याना बाजारपेठेतील सर्व अतिक्रमण काढण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. संग्राम जगताप यांनी भेट देवून व्यापार्‍यांशी चर्चा करून या प्रश्नावर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. आंदोलनस्थळी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कोतवाली, तोफखाना पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला.यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, अभिषेक कळमकर, सचिन जाधव, स्मिता अष्टेकर, विक्रम राठोड, मैड, अभिमन्यू जाधव व व्यापारी वर्ग उपस्थित होते.

No comments:

Post a Comment