जनतेचे प्रश्न सोडविण्याची स्व.अनिल राठोडांची तळमळ प्रेरणादायी - आ. लंके - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

जनतेचे प्रश्न सोडविण्याची स्व.अनिल राठोडांची तळमळ प्रेरणादायी - आ. लंके

 जनतेचे प्रश्न सोडविण्याची स्व.अनिल राठोडांची तळमळ प्रेरणादायी - आ. लंके

माजी आ.अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने रक्तदान शिबीर


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्व.अनिल राठोड यांनी जनसेवेचा जो वसा हाती घेतला होता, तोच आदर्श आपण सांभाळत जनतेमध्ये राहून जनतेची कामे करत आहोत. त्यांची लोकांप्रती असलेला आदरभाव आणि त्याचे प्रश्न सोडविण्याची तळमळ ही नेहमीच प्रेरणादायी राहील. आज त्यांच्या जयंतीनिमित्त  त्यांनी दाखविलेल्या आदर्शवर काम करत रक्तदानासारख्या सामाजिक उपक्रमातून त्यांना अभिवादन करण्याचा उपक्रम समाजाभिमुख असा आहे, असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले.
माजी आ.अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने नेता सुभाष चौक येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटन आमदार निलेश लंके यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी आ. लंके यांनी स्व राठोड यांनी जनमाणसात मिसळत केलेल्या कामांची प्रशंसा केली.प्रारंभी आ.निलेश लंके यांनी स्व.अनिल राठोड यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. यावेळी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, दिलीप सातपुते, अभिषेक कळमकर आदिंनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विक्रम राठोड म्हणाले, शिवसेना आणि स्व.अनिलभैय्या राठोड हे समीकरण पक्के होते. नागरिकांचे कामे व्हावीत, त्यांच्या अडचणी दुर व्हाव्यात यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. तळगाळातील लोकांना न्याय मिळाला पाहिजे, ही त्यांची कायम भुमिका राहिली. मोबाईल आमदार म्हणून त्यांचा लौकिक आजही नागरिकांच्या स्मरणात कायम आहे. त्यांचे कार्य अशाच पद्धतीने पुढे सुरु ठेवण्याच्या हेतूने रक्तदानसारखा उपक्रम हाती घेतला आहे. यापुढेही अशाच लोकाभिमुख उपक्रमातून त्यांचे कार्य सुरु ठेवण्याची आपणा सर्वांची जबाबदारी आहे, असे सांगितले.
याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, युवा सेना राज्य सहसचिव विक्रम राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर अभिषेक कळमकर, सुरेखा कदम, दिलीप सातपुते, संजय शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, गणेश कवडे, सचिन शिंदे, मदन आढाव, दत्ता कावरे, दत्ता जाधव, शाम नळकांडे, अमोल येवले, संतोष गेनप्पा, योगिराज गाडे, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, गिरिष जाधव, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, प्रशांत गायकवाड, सचिन जाधव, हर्षवर्धन कोतकर, आशा निंबाळकर, अरुणा गोयल, निर्मला धुपधरे अरुण झेंडे, मुन्ना भिंगारदिवे, अंबादास शिंदे, सोपान कारखिले, भाकरे महाराज, सुमित धेंड, अक्षय नागापुरे, अभिजित अष्टेकर, नरेश भालेराव, विकी पवार, महेश शेळके, रमेश खेडकर, संदिप दातरंगे, विशाल वालकर, संजय आव्हाड, शरद कोके आदिसह शिवसैनिक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment