शेतात, प्रशासकीय क्षेत्रात, राजकारणात, कलाक्षेत्रात. विश्वाची निर्मिती ही तिच्यामुळेच. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

शेतात, प्रशासकीय क्षेत्रात, राजकारणात, कलाक्षेत्रात. विश्वाची निर्मिती ही तिच्यामुळेच.

 शेतात, प्रशासकीय क्षेत्रात, राजकारणात, कलाक्षेत्रात. विश्वाची निर्मिती ही तिच्यामुळेच.

‘ती’ सर्वत्र!- महापौर रोहिणीताई शेंडगे.

9 महिलांना नारीशक्ती पुरस्कार.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज शेतात काम करणारी देखील महिला आहे व पायलट देखील महिला आहे ती प्रशासकीय सेवेत आहे. ती राजकारणात आहे ती कलेच्या क्षेत्रात आहे. ती अर्थ क्षेत्रात आहे प्रत्येक ठिकाणी ती पुढेच आहे. कोणत्याच क्षेत्रात ती मागे नाही विश्वाची निर्मिती देखील तिच्या मुळेच आहे. आपण स्त्री असल्याचा प्रत्येकीला अभिमानच आहे आणि तो असायलाच हवा. ‘ती’ सर्वत्र आहे, असं प्रतिपादन महापौर रोहिणी ताई शेंडगे यांनी केले आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून अशीच एक शोध यात्रा अहमदनगर महानगरपालिका व अनमोल प्रकाशन यांच्या वतीने उंच माझा झोका एक सांगितीक महिलाराज कार्यक्रम सहकार सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमामध्ये शहरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा नारी शक्ती पुरस्कार देवून स्त्रीच्या आत्मभानाचा गौरव करण्यात आला. उंच माझा झोका एक सांगितीक महिलाराज कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करुन करण्यात आली.
यावेळी प्रमुख उपस्थिती सौ.दिपाली भोसले-सय्यद, शिवसेना नेत्या, सिनेअभिनेत्री, सौ.मीनाताई कांबळी, शिवसेना उपनेत्या, मातोश्री महिला बचत गट उपाध्यक्ष कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.महापौर सौ.रोहिणीताई शेंडगे, सभापती महिला व बालकल्याण समिती सौ.पुष्पाताई अनिल बोरुडे, उपसभापती सौ. मीनाताई संजय चोपडा, माजी महापौर सौ.शिलाताई शिंदे, सौ.सुरेखाताई कदम, सौ.सोनाली नांदुरकर, संचालिका, अनमोल प्रकाशन पुणे, नगरसेविका सौ.लताताई शेळके, सौ.सुवर्णाताई गेणाप्पा, श्रीमती मंगलाताई लोखंडे, सौ.दिपालीताई बारस्कर, सौ.पल्लवीताई जाधव, सौ.रिताताई भाकरे, सौ.आश्विनी जाधव, शिवसेना महिला पदाधिकारी सौ.आशाताई निंबाळकर, सौ.अरुणाताई गोयल, सौ.सुष्माताई पडोळे,सौ.स्वाती गोहेर, आदि व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महापौर पुढे म्हणाल्या की, स्त्री म्हणजे प्रतिक त्यागाच, स्त्री म्हणजे प्रतिक शौर्याचा स्त्री म्हणजे प्रतिक मायेचा आणि स्त्री म्हणजे प्रतिक कर्तृत्वाचा अश्याच कतृत्ववान महिलांनी आपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करुन स्वत:चे कतृत्व सिध्द केल्या बद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करते. मुलगी बहिण आई पत्नी
अशी अनेक नाती प्रत्येक महिला निभावत असतेच परंतू त्याच बरोबर अनेक महिला आपला संसार सांभाळत आपली दैनंदिन कामे व करियर सांभाळत असतात आणि यातूनच ते स्वत:ला सिध्द करत असतात असेही त्या म्हणाल्या.
सौ.दिपाली भोसले-सय्यद म्हणाल्या की, स्त्री काय करु शकते हे आजच्या दैनंदिन जीवनात तीने करुन दाखविले आहे. घर संसार व विविध कार्य क्षेत्रात काम करुन महिला दिन असो किंवा शिवजयंती असो स्त्री बुलेट घेवून रस्त्यावर उतरते. एवढे सगळे एका स्त्री मध्ये आहे. स्त्रीयामध्ये काय आहे हे कळळे पाहिजे. आपण काय करु शकतो आपल्या मध्ये काय आहे म्हणजे स्त्री आपले आयुष्य सुदंर करु शकते संयम हा फक्त स्त्रीयांमध्ये आहे. स्त्रीया काम जोपासून घराच्यांना सुखी ठेवू  शकते हे ज्या स्त्रीला कळलं त्या स्त्रीचे आयुष्य खूप सुंदर होईल हेच प्रत्येक स्त्रीने शोधायचे असते.
यावेळी सभापती महिला व बालकल्याण समिती सौ.पुष्पाताई बोरुडे म्हणाल्या की, अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने महिला बाल कल्याण विभागाअंतर्गत महिला दिनाचे औचित्य साधून प्रथमच स्त्रीच्या आत्मभानाचा गौरव करणारी एक शोध यात्रा उंच माझा झोका एक सांगितीक महिलाराज कार्यक्रमाचे आयोजन केले. महिला बालकल्याण विभागाअंतर्गत काम करताना महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीमुळे निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळे महिलांसाठी विविध उपक्रम राबविणे अडचणीचे होते. शहरातील महिलांसाठी विविध उपक्रम कार्यक्रम घेण्याचा मानस आहे. आजच्या कार्यक्रमाचे नियोजन देखील महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी तसेच ज्या महिलांना नारी शक्ती पुरस्कार देवून गौविण्यात आले त्यांना त्यांचे काम करित असताना प्रोत्साहन मिळणार आहे व त्यांचे कार्य पाहून इतर महिलांनी अश्या सामाजिक कामात सक्रीय होवून आपणही काही करु शकतो हे दाखविण्यास बळ मिळणार आहे.
यावेळी उपसभापती महिला व बालकल्याण समिती सौ.मीनाताई चोपडा म्हणाल्या की, बर्‍याच वर्षांनी महानगरपालिकेच्या वतीने महिलांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले महिलांचा सन्मान होणे आवश्यक आहे. महिला दैनंदिन जीवनामध्ये कार्य करित असताना एक दिवस आनंद घेण्याचा दृष्टीने महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचा महिलांनी आनंद घेतला याबद्दल मी सर्वांचे आभार आहेत.
यावेळी महिला व बालकल्याण विभाग अहमदनगर महानगरपालिका व अनमोल प्रकाशन, पुणे यांच्या वतीने श्रीमती छायाताई फिरोदिया, श्रीमती डॉ.गौरी कुलकर्णी-चिंतामणी, श्रीमती ज्योती गडकरी, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, श्रीमती मनिषा गुगळे, श्रीमती अलका मुंदडा, श्रीमती प्रमिला राऊत, श्रीमती स्वाती सुडके, कुमारी अंजली गायकवाड, इंडियन आयडॉल फेम, श्रीमती वृंदा सोरटुरकर या 9 महिलांचा यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नारी शक्ती पुरस्कार देवून गौरविण्यांत आले. यावेळी विविध प्रमुख महिला मान्यवरांचा सत्कार करण्यांत आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गौरी जोशी यांनी केले व आभार सौ.सोनाली नांदुरकर, संचालिका अनमोल प्रकाशन यांनी मानले.
सर्व क्षेत्रात काम करताना महिला दिनाचा एक दिवस महिलांना आनंद घेता यावा यादृष्टीने व महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमामध्ये गायक, वादक, निवेदक हे सर्व महिलाच होते. कार्यक्रमाचे आयोजन मा.शासनाच्या कोव्हीड-19 च्या निर्देशानुसार नियमांचे पालन करुन करण्यात आले.

No comments:

Post a Comment