अण्णा हजारेंच्या माजी स्वीय सहाय्यकांसह प्रतिष्ठितांवर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 4, 2022

अण्णा हजारेंच्या माजी स्वीय सहाय्यकांसह प्रतिष्ठितांवर गुन्हा दाखल.

 अण्णा हजारेंच्या माजी स्वीय सहाय्यकांसह प्रतिष्ठितांवर गुन्हा दाखल.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय टंचाई विभाग यांनी पारनेर येथील साई सहारा या कंपनीला टँकरने पाणी पुरवठा करण्याचे गेली पाच वर्षे कंत्राट दिले होते. या कंपनीने पाणी पुरवठा करताना अनेक शासन नियमांचा भंग करून कोट्यवधी रुपयांचा निधी हडप करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता आनंद बबनराव रुपनर यांनी पारनेर पोलिसांना फिर्याद दिली आहे. साई सहारा ही कंपनी राळेगण सिद्धी येथील ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे माजी सचिव सुरेश पठारे , निघोज येथील मळगंगा डेअरी उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मच्छिंद्र लंके , अभय औटी , दादाभाऊ पठारे , नितीन अडसुळ , विठ्ठल गाजरे, विठ्ठल पवार यांच्या मालकीची असून बुधवारी (ता. 2) पारनेर पोलिस ठाण्यात पुरवठा करणार्‍या साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यात 2019 साली निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पाणी पुरवठ्यावर तब्बल 102 कोटी रुपयांचा खर्च झाला होते. जिल्ह्यात 2019 मध्ये जिल्ह्यातील बहूतांश तालुक्यात पिण्याच्या पाण्याचा टँकरने पाणी पुरवठा केला जात होता. जिल्ह्यातील विक्रमी टँकर त्या कालावधीत धावले. त्यावेळी 800 पेक्षा अधिक टँकरने जिल्ह्यात पाणी पुरवठा झाल्याची कागदोपत्री नोंद आहे. त्यावर्षी पाणी पुरवठा करणार्‍या टँकरने खेपा कमी करुन जास्त दाखवल्या, आंतरातही घोळ केला, तसेच अन्य त्रुटीतून टँकर घोटाळा केल्याचा आरोप करत निघोज (ता. पारनेर) येथील लोकजागृती शोध प्रतिष्ठानने तक्रार करुन चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी हे प्रकरण बरेच गाजले होते. शासनाने या प्रकाराच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय चौकशी समिती नियुक्त करुन चौकशी केली. समितीने विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला. जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांना हा अहवाल अवलोकनासाठी पाठवला होता.
या अहवालाद्वारे शासनाच्या करारनाम्याचा भंग केला. खेपा न भरता त्या भरल्याचे दाखवत अतिरिक्त रक्कम घेऊन शासनाची फसवणूक केल्याचे व गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता आनंद रुपनर यांच्या फिर्यादीवरुन बुधवारी (ता. 2) पारनेर पोलिस ठाण्यात पुरवठा करणार्‍या साई सहारा इन्फ्राण्ड फसिलिटी प्रा. लि. यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

No comments:

Post a Comment