माळीवाड्यातील तरुणावर हल्ला करणारे तीनही आरोपी गजाआड - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, March 4, 2022

माळीवाड्यातील तरुणावर हल्ला करणारे तीनही आरोपी गजाआड

 माळीवाड्यातील तरुणावर हल्ला करणारे तीनही आरोपी गजाआड.

आरोपींना 8 मार्चपर्यत पोलीस कस्टडी

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः तलवार, कुर्हाड व लाकडी दांडक्याने तरूणावर हल्ला करणारे आरोपी सागर दीपक देठे, राहुल दीपक देठे, निलेश देठे (सर्व रा.नालेगाव, अहमदनगर) यांना तोफखाना पोलिसांनी अटक केली असून तीनही आरोपींना न्यायालयाने 8 मार्च पर्यत पोलीस कस्टडी सुनावली आहे.
अनिल गायकवाड हा सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून दिल्लीगेट येथून माळीवाडा येथे जात असताना त्यांना सागर देठे याने नालेगावातील वारूळाचा मारूती कमानीजवळ थांबविले व त्यांच्या कानाखाली मारली.अनिल यांनी कानाखाली मारल्याचा जाब विचारला असता राहुल, निलेश, दीपक व त्याची पत्नी हे तेथे आले. त्यांनी अनिल यांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली.दीपक याने त्याच्याकडील कुर्‍हाडीने अनिल यांच्या हातावर मारली तर सागरने त्याच्याकडील तलवारीने अनिलच्या डोक्यावर वार करत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. त्यातील तिघांना तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान या गुन्ह्यातील दीपक देठे व त्याची पत्नी पसार आहेत.
घटनेचा तपास तोफखाना पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे हे करत होते त्यांना गुप्त माहिती मिळाली की तिन्ही आरोपी नेप्ती नाका परिसरामध्ये आहेत आता गेल्यास मिळून येतील लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे,पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रेय जपे ,पोलीस नाईक शैलेश गोमसाळे,पोलीस कॉन्स्टेबल सतीश त्रिभुवन यांच्या पथकाने तिन्ही आरोपींना नेप्ती नाका परिसरामध्ये अटक केली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे हे करत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here