यादीत अनेक तफावती.. एकाच रस्त्याचे तुकडे करून नावांची संख्या वाढविली.. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, March 4, 2022

यादीत अनेक तफावती.. एकाच रस्त्याचे तुकडे करून नावांची संख्या वाढविली..

 ‘मनपाने 100 नव्हे तर 133’ रस्त्यांची यादी केली प्रसिध्द

यादीत अनेक तफावती.. एकाच रस्त्याचे तुकडे करून नावांची संख्या वाढविली..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नगर दौर्‍यात मनपा आयुक्तांनी शहरातील 100 रस्त्याचे काम पूर्ण केल्याच्या घोषणेला शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष किरण काळे यांनी प्रश्न उपस्थित करीत या रस्त्यांची यादी दाखवा असे आव्हान केले होते. त्याला उत्तर म्हणून काल दि.3 मार्च रोजी संध्याकाळी महानगरपालिकेच्या वतीने सामाजिक माध्यमांवर आयुक्त शंकर गोरे, महापौर रोहिणी संजय शेंडगे व उपमहापौर गणेश भोसले यांच्या वतीने मनपा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत फेब्रुवारी 2022 अखेर पुर्ण करण्यात आलेल्या रस्त्यांच्या नावाची यादी ’मागील 6 महिन्यात 100 नव्हे 133 रस्ते झाले’ अशा आशयाच्या जाहिराती पोस्टर व्हायरल करत प्रसारीत केली आहे.
महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी नुकतीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत शहरात 100 रस्ते पुर्ण केल्याची घोषणा केली. त्यावर शहरातील नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. संपुर्ण शहर खड्ड्यांनी, धुळीने भरलेले असतानाही शहराचे आयुक्त बेधडकपणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याच्या महत्वाच्या मंत्री महोदयांसमोर 100 रस्ते झाल्याचे सांगत असल्याने नागरिक संतापले होते. सामाजिक, राजकिय कार्यकर्ते 100 रस्त्यांच्य दुरावस्थेविषयी आंदोलनाच्या तयारीत आहेत. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने किरण काळे यांच्य नेतृत्वाखाली बाजारपेठेत आंदोलनही केले. या विषयाची शहरभर उलटसुलट चर्चा सुरू होती. मनपा आयुक्त व पदाधिकारी आणि कारभारी यांना शहरातील लोक जाहीर व सामाजिक माध्यमांवर सवाल विचारत होते. बाजारपेठेतील मुख्य असलेल्या सावरकर चौक ते चितळे रोड ते दाळमंडई या संपुर्ण रस्त्याची चाळण झाली, संपुर्ण रस्ता धुळीने माखलेला आहे. बाजारपेठेची शहरातील व्यापाराची पार वाट लागली आहे. थोड्या बहुत फरकाने शहरातील अनेक रस्त्यांची हिच गत झालेली असताना,  मनपा आयुक्त मंत्री महोदयांसमोर फेक मारत आहेत,  खोटे बोलत आहेत काय, अशी लोकांमधे चर्चा होती.
मनपाच्या वतीने प्रसारीत केलेल्या पोस्टरवरच्या माहितीमध्ये शहरातील लोकांच्या दिशाभुलीच्या अनेक गमतीदार गोष्टी आहेत. एकाच रस्त्याचे अनेक तुकडे करून नावांची संख्या वाढविलेली आहे. उदा. यादीतील क्र. 5 ते 7 हा जीपीओ चौक ते धरती चौक हा एकच अखंड रस्ता असताना त्याचे तीन तुकड्यात नाव लिहलेले आहे. यादीतील क्र. 10 चा रस्ता सुभेदार गल्ली ते तालुका पोलिस स्टेशन असा लिहलेला आहे. तालुका पोलिस स्टेशन भिंगार येथे आहे. हा रस्ता सुभेदार गल्ली ते भिंगार असा केलेला आहे काय ? हा प्रश्न पडतो. क्र.11 हा रस्तासुध्दा तालुका पोलिस स्टेशन पर्यंत दाखविलेला आहे. क्र.49 व क्र.116 हा एकच रस्ता असताना दोन ठिकाणी नाव लिहले आहे. क्र. 31 व क्र.85 हा एकच रस्ता असताना दोन ठिकाणी नावे लिहली. क्र. 20 व क्र.90 एकच रस्ता आहे. क्र.93 हा संपुर्ण रस्ता असताना क्र. 94 यादीमधे पुन्हा लिहला आहे. हे रस्ते कोणत्या निधीमधून करण्यात आलेले आहेत याची माहिती दिलेली नाही. यातील काही रस्ते आमदार निधीतून केलेले असतील. सिमेंट काँक्रिट कि डांबरी हे लिहलेले नाही. रस्त्यांच्या दर्जाबाबत व दायित्वाबाबत यामध्यें काहीही माहिती प्रसारीत केलेली नाही. प्रसिध्द केलेल्या यादीप्रमाणे नागरिकांनी आपापल्या भागातील रस्त्यांची सध्याची आवस्था पाहुन काही तफावत असल्यास मनपा प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या पाहिजेत.
या पोस्टरवर नुतन स्थायी समिती सभापती कुमार वाकळे, विरोधीपक्ष नेता संपत बारस्कर, महिला व बालकल्याण सभापती पुष्पा अनिल बोरूडे तसेच उपसभापती मिनाताई संजय चोपडा यांची नाव लिहलेली नाहीत. स्थायी समिती सभापती यांनी पदभार स्विकारून बरेच दिवस झाले तर इतर पदाधिकारी अनेक दिवसांपासुन कार्यरत आहेत तरीही त्यांचे नाव मनपाच्या वतीने प्रसारीत करण्यात येत असलेल्या पोस्टरवर का नाही हे समजले नाही.
कोणत्याही मनपाचे काम जर 100 रूपयांचे असेल तर त्यापैकी 40 रूपये हे अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी व सदस्यांमधे टक्केवारीच्या स्वरूपात ’जिरले’ जातात, 60 रूपयंमधेच विकासकाम होत असते, हे सर्वश्रूत आहे. अहमदनगर महानगरपालिकेने  हे 133 रस्ते जर सहा महिन्यांत पुर्ण केले असतील तर या कोट्यावधी रूपयांच्या निधीमधून 40% रक्कम कुठे ’जिरली’ असेल, हे विचार करण्यासारखे आहे.

No comments:

Post a Comment