स्व.अनिल भैय्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठविला- संभाजी कदम - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

स्व.अनिल भैय्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठविला- संभाजी कदम

 स्व.अनिल भैय्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठविला- संभाजी कदम

शिवसेना उपनेते स्व.अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा येथे अभिवादन


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः स्व.अनिल राठोड यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच आवाज उठविला. नागरिकांचे प्रश्न सुटले पाहिजे, त्यांना त्याचे हक्क मिळाले पाहिजे, ही त्यांची अग्रही भुमिका असत. त्यांची काम करण्याची पद्धत आणि जनतेप्रती असलेले प्रेम यामुळेच 25 वर्षे त्यांना जनतेने आमदार केले, हीच त्यांच्या कार्याची पावती म्हणावी लागेल. त्यांची शिकवण आपण आजही यापुढे आपल्या कृतीतून आचरणात आणली पाहिजे.  शिवसेना पक्ष नेहमीच सर्वसामान्यांसाठी कार्यरत राहणारा पक्ष आहे. नागरिकांच्या अडअडचणी सोडवून त्यांना सेवा देण्याचे काम यापुढेही असेच सुरु राहील, असे प्रतिपादन शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम यांनी केले.
शिवसेना उपनेते स्व.अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त माळीवाडा शिवसेना शाखेच्यावतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी महापौर सुरेखा कदम, अभिषेक कळमकर, संजय शेंडगे, युवा सेना जिल्हाप्रमुख विक्रम राठोड, दिलीप सातपुते, दत्ता जाधव, विष्णूपंत म्हस्के, सचिन जाधव, संग्राम कोतकर, दत्ता कावरे, संतोष गेनप्पा, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, अशोक दहिफळे, सुरेश तिवारी, मुन्ना भिंगारदिवे, अरुण झेंडे, संजय आव्हाड, संदिप दातरंगे, मंगेश शिंदे, अण्णा घोलप, उमेश भांबरकर, अंबादास शिंदे, भाकरे महाराज आदि उपस्थित होते. याप्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे म्हणाल्या, शिवसेना नेहमीच सर्वसामान्यांच्या पाठिंशी खंबीरपणे उभे राहिली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्व.अनिल राठोड यांची तळमळ ही आजही आदर्शवत आहे. त्यांनी नेहमीच महिलांचा सन्मान करुन त्यांचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिलेच परंतु पक्षातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मानचे पदाचाही बहुमान मिळवून दिला. त्यांचे कार्य नेहमीच आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी राहील, असे सांगितले.
याप्रसंगी सुरेखा कदम, अभिषेक कळमकर, दिलीप सातपुते, दत्ता कावरे आदिंनी मनोगतातून स्व.अनिलभैय्या यांच्या कार्याचा गौरव केला. शेवटी संतोष गेनप्पा यांनी मानले. यावेळी आशा निंबाळकर, अरुण गोयल आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment