जग असेपर्यंत लोकनेता अनिल राठोड हे नाव नगरकर घेतील- महापौर रोहिणी शेंडगे - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, March 12, 2022

जग असेपर्यंत लोकनेता अनिल राठोड हे नाव नगरकर घेतील- महापौर रोहिणी शेंडगे

 जग असेपर्यंत लोकनेता अनिल राठोड हे नाव नगरकर घेतील- महापौर रोहिणी शेंडगे


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः जन सामान्याचा लोक नेता अशी ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या अहोरात्र लोकांच्या सेवेच्या कार्यातून निर्माण करणारे स्वर्गीय अनिल राठोड यांच महत्त्व आज सर्वांना कळत आहे जग असे पर्यंत लोकनेता अनिल राठोड यांचे नाव नगरकर घेतील असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.
स्वर्गीय अनिल राठोड यांच्या जयंतीनिमित्त नागापूर बोल्हेगाव उपनगर शिवसेनेच्यावतीने राघवेंद्र स्वामी मंदिर येथे लहान मुलांना टिफिन बॉक्स व खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी महापौर रोहीणी शेंडगे, सभागृह नेता अशोक बडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, मदन आढाव, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी शहर प्रमुख दिलीप सातपुते, विक्रम राठोड, दत्तात्रेय सप्रे, संतोष गेनाआप्पा, काका शेळके, लोबा कातोरे, बालचंद भाकरे, दिलीप पेटकर, जेम्स अल्लाट, अंबादास शिंदे, पप्पू भाले उपस्थित होते. तसेच निंबळक येथील गोशाळेत चारा वाटप करण्यात आला. राजकारणा पेक्षा आपण सर्वांनी सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे ही शिकवण अनिल राठोड यांची होती. त्यांनी सामान्य लोकांना कायम त्यांच्या अडचणी सोडवून न्याय देण्याचा प्रयत्न केला. मोबाईल आमदार म्हणून त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती. सामान्य घरातील लोकांना राजकारणात त्यांनी मोठे स्थान मिळवून दिले आणि सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडणारा एकच नेता अनिल भैय्या अशी ओळख निर्माण केली होती. असे अशोक बडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment