पिस्टुल विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Wednesday, March 23, 2022

पिस्टुल विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक.

 पिस्टुल विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक.


नगरी दवंडी/प्रतिनिधी
जामखेड ः
बेकायदेशीर पिस्टल विक्री करण्याच्या उद्देशाने जामखेड येथे आलेल्या दोन आरोपींना जामखेड पोलीसांनी बस स्थानक परिसरात छापा टाकून रंगेहात पकडले. या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणी जामखेड पोलीस स्टेशन चे पो.काँ. शाम बाबासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विकास बळिराम नवगिरे व आण्णा आहिलाजी शिंदे रा. हरकिलिंबगाव ता.माजलगाव जि.बीड या आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आर्म अ‍ॅक्ट नुकसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी विकास बळीराम नावगिरे व अण्णा अहिलाजी शिंदे हे दोघे दि 20 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जामखेड बसस्थानक परिसरात पिस्तूलसह असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना समजली. यानुसार त्यांनी सापळा लावला पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय लाटे, पोलीस नाईक अजय साठे, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचीन सगर, पोलीस कॉन्स्टेबल बाळु खाडे, पोलीस कॉन्स्टेबल श्यामगुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल विष्णु चव्हाण यांच्या पथकाने छापा टाकून बस स्थानकाच्या समोर नगर जामखेड रोडवर वरील दोन्ही आरोपींना पकडले. या आरोपींनकडे पंचवीस हजार रुपयांचे देशी मॅगझिन सह पिस्टल अढळुन आले. या धडाकेबाज कारवाई मुळे पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here