टाकळी ढोकेश्र्वरचे उपसरपंच चव्हाण यांचा राजीनामा - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 26, 2022

टाकळी ढोकेश्र्वरचे उपसरपंच चव्हाण यांचा राजीनामा

 टाकळी ढोकेश्र्वरचे उपसरपंच चव्हाण यांचा राजीनामा

शुभम गोरडे यांची उपसरपंच पदावर वर्णी लागण्याची शक्यता!

टाकळी ढोकेश्वर - तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील व महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या टाकळी ढोकेश्वर येथील उपसरपंच सुनिल चव्हाण यांनी आपला राजीनामा दिला आहे.उपसरपंच चव्हाण यांनी आपल्या पदाचा ९ फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला असून 14 फेब्रुवारी रोजी तो मंजूर करण्यात आला असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सौ.रोहिणी तरवडे मॅडम यांनी दिली आहे.
    उपसरपंच सुनिल चव्हाण यांनी सरपंच अरुणा खिलारी यांच्याकडे आपला राजीनामा वैयक्तिक व घरगुती कारणामुळे दिला असल्याचे नमूद केले होते.त्यानुसार हा राजीनामा गटविकास अधिकारी किशोर माने यांच्याकडे पाठवण्यात आला होता. आघाडी सरकारची पुनरावृत्ती करत शिवसेना पक्षाचे पॅनल प्रमुख अशोक कटारिया व राष्ट्रवादी पक्षाचे पॅनल प्रमुख प्रदीप खीलारी यांनी या राजकीय घडामोडी घडवून आणत सत्ता स्थापन केली होती.उपसरपंच पदी गंगाधर निवडुंगे व शुभम गोरडे यांना पुढील दोन दोन वर्षे संधी दिली जाईल असे बैठकीत ठरले होते. 
    टाकळी ढोकेश्वर मधे गेले वीस वर्षे सुनिल गोरडे हे ग्रामपंचायत सदस्य राहिले,मागील पंचवार्षिक मधे त्यांना उपसरपंच पदाचा शब्द असून त्यांना ते मिळाले नाही आता गावकरी ह्यावेळेस सुनिल गोरडे यांच्या निष्ठेला न्याय देण्यासाठी त्यांच्या मुलाला विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शुभम गोरडे यांना संधी दिली जातेय का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment