भाजी-फळविक्रेते फेरीवाल्यांचे चितळे रोडवर अतिक्रमण. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 22, 2022

भाजी-फळविक्रेते फेरीवाल्यांचे चितळे रोडवर अतिक्रमण.

 रस्त्यावर बसणार्‍या भाजी-फळविक्रेत्यांना मार्केटच्या मोकळ्या जागेत स्थलांतरीत करा.

भाजी-फळविक्रेते फेरीवाल्यांचे चितळे रोडवर अतिक्रमण.

सामाजिक कार्यकर्ते ऋषीकेश गुंडलांचे मनपा आयुक्तांना निवेदन- मनपाचे उत्पन्नही वाढेल

रस्त्यावर व रस्ता अडवून उभ्या राहणार्‍या फेरीवाले, फळांच्या गाड्या, भाजीवाले यांची जर चितळे रोड व पूर्वीच्या नेहरु मार्केटमध्ये बसण्याची व्यवस्था केल्यास या ठिकाणचा वाहतूकीचा प्रश्न सुटून रस्ता मोकळा व वाहतूकीस, पादचार्‍यांना येण्या जाण्यास खुला होईल. तसेच मनपाचे सदर ठिकाणचे शॉपिंग कॉप्लेक्स अगर प्रस्तावित बांधकाम होईपावेतो तेथे हातगाडीवाले, भाजीवाल्यांना आतमध्ये बसविण्याबाबत सक्ती केल्यास त्यापासून मनपाला देखील उत्पन्न मिळेल. त्यासाठी मनपाला फार मोठा खर्च करण्याची आवश्यकता पडणार नाही केवळ तेथे जेन्टस व लेडीज टॉयलेटची व्यवस्था करुन पटांगणात फेरीवाले व विक्रेत्यांना उभे राहण्याची जागा देण्यात यावी व त्यांच्याकडून मनपाने दैनंदिन स्वरुपात पावती फाडून वसुली करता येईल. तसेच या जागेव्यतिरिक्त रस्त्यावर थांबणार्‍या फेरीवाल्यांवर अतिक्रमण विभागाद्वारे कारवाई करण्यात यावी व रस्ता मोकळा व वाहतूकीस खुला ठेवण्यात यावा - ऋषीकेश गुंडला, सामाजिक कार्यकर्ते


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरातील चितळे रोड रस्त्यावरील मनपाच्या अखत्यारीतील भाजी मार्केटच्या दहा-बारा वर्षांपूर्वी काढण्यात आलेल्या इमारतीच्या जागेच्या मूल्यांकनाप्रमाणे निविदा प्रक्रिया होत नसल्यामुळे अनेक वर्षापासून ही जागा विनावापर पडून असून या रस्त्यावर भाजीपाला विकणारे,फळविक्रेते ठाण मांडून आहेत. या रस्त्यावर पायी चालणे दिवसेंदिवस अवघड होत असून रोजचं रस्त्यावर ट्राफिक जामची समस्या निर्माण होत आहे. यासाठी भाजी मार्केटची मोकळी जागा भाजीविक्रेते फळविक्रेते फेरीवाल्यांना उपलब्ध करून रस्त्यावर बसणार्‍या भाजी-फळविक्रेत्यांना या जागेवर स्थलांतरीत करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ऋषिकेश गुंडला यांनी मनपा आयुक्तांकडे केले आहे.
मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात गुंडला यांनी म्हटले आहे की मी वरील ठिकाणी राहणारा रहिवासी नागरीक असून सामाजिक कार्यकर्ता आहे. मनपाच्या अखत्यारीतील चितळे रोड भाजी मार्केटची मोठी इमारत मनपाद्वारे सुमारे 10 ते 12 वर्षापूर्वी पाडण्यात आलेली आहे, सदर ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून जागा विनावापर पडून आहे. जागेचे मुल्यांकनाप्रमाणे निविदा प्रक्रिया होत नसल्यामुळे सदर जागा विनाकारण मोकळी पडून आहे मनपाचे सदर जागेतून प्राप्त होऊ शकणारे प्रस्तावित उत्पन्न बुडत आहे. त्यामुळे विनाकारण मनपाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच सदर मनपाच्या मार्केटसंबंधी आणखी एक महत्वाची समस्या व बाब म्हणजे सदर ठिकाणी मार्केट पाडल्यामुळे ती जागा मोकळी व भाजीवाले, फेरीवाले मात्र रस्त्यावर उभे राहून रस्ता अडवीत आहेत. त्यामुळे रस्त्याचे वाहतूकीत देखील मोठ्या प्रमाणावर अडथळे निर्माण होत आहे त्यामुळे नागरीकांना कायम वाहतूकीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते व वारंवार तेथे ट्रॅफिक जाम होत आहे. तरी आयुक्तांनी या मागणीचा विचार करावा असे निवेदनात म्हटले आहे.

No comments:

Post a Comment