100% बालकांना पल्स पोलिओ डोस देणार ः महापौर रोहिणीताई शेंडगे. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 22, 2022

100% बालकांना पल्स पोलिओ डोस देणार ः महापौर रोहिणीताई शेंडगे.

 100% बालकांना पल्स पोलिओ डोस देणार ः महापौर रोहिणीताई शेंडगे.

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने मनपात नियोजन बैठक संपन्न.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः पोलिओ आजाराचे निर्मुलन करण्यासाठी सन 1995 पासून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम ते 5 वयोगटातील सर्व बालकांसाठी राबविण्यात येत आहे. सदरची मोहिम दि. 27 फेब्रुवारी 2022 या दिवशी अयोजित करण्यात आली आहे. या मोहिमध्ये बायव्हायलंट या लसीचा वापर करण्यात येणार आहे. मोहीम 100 टक्के यशस्वी होण्याकरिता अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवार दि. 27 फेब्रुवारी 2022 च्या अनुषंगाने मा. महापौर सौ. रोहिणी शेंडगे यांचे अध्यक्षतेखाली नियोजन बैठक संपन्न झाली.
महात्मा फुले आरोग्य केंद्र , जिजामाता आरोग्य केंद्र , तोफखाना आरोग्य केंद्र , सिव्हील आरोग्य केंद्र , केडगाव आरोग्य केंद्र , नागापूर आरोग्य केंद्र, मुकुंदनगर आरोग्य केंद्र  व कॅन्टोन्मेंट हॉस्पीटल  याप्रमाणे पोलिओ बुथचे नियोजन असून एकूण 905 कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत. मनपा स्तरीय अधिकारी- 5, वैदयकीय अधिकारी - 8 व सुपरवायझर 44 नेमण्यात आलेले आहेत. सर्व आरोग्य केंद्र मिळून एकूण 45473 उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. याबाबत दि. 22-2-2022 23-2-2022 रोजी व्हॅक्सीनेटर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले आहे. बाळ आजारी असले तरीही, नुकतेच जन्मलेले असले तरीही व यापूर्वी पोलिओचा डोस दिला असला तरीही सदर दिवशी 5 वर्षाच्या आतील बाळाला पोलिओचा डोस देण्यात यावा.तरी सर्व नागरिकांनी आपल्या 0 ते 5 वयोगटातील सर्व बालकांना पोलिओचा डोस दयावा. असे आवाहन मा. महापौर सौ.रोहिणी शेंडगे यांनी केले आहे.
याप्रसंगी आयुक्त श्री.शंकर गोरे, मा. उपमहापौर श्री गणेश पुंडलिक भोसले, मा. स्थायी समिती सभापती श्री. कुमार वाकळे, मा. सभागृह नेता श्री. अशोक किसन बडे, मा. विरोधी पक्ष नेता श्री. संपत बारस्कर, मा. महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती बोरुडे पुष्पा अनिल, मा. उपसभापती श्रीमती चोपडा मीना संजय, मा. अतिरिक्त आयुक्त श्री. प्रदीप पठारे, मा. उपायुक्त श्री. श्रीनिवास कुरे, श्री. यशवंत डांगे यांनी केले आहे. यावेळी मा. महिला व बालकल्याण समिती सभापती श्रीमती बोरुडे पुष्पा अनिल, आरोग्य अधिकारी डॉ. सतिष राजुरकर, प्र प्रसिध्दी अधिकारी श्री. शशिकांत नजान, वैदयकीय अधिकारी आयेशा शेख, नलिनी थोरात, गिरीष दळवी, कविता माने, भारती डापसे, आशना सय्यद, शिल्पा चेलवा, गितांजली पवार, समन्वयक अमोल पागिरे, तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment