केडगाव ग्रामस्थ व युवकांचा पुढाकार. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

केडगाव ग्रामस्थ व युवकांचा पुढाकार.

 केडगाव ग्रामस्थ व युवकांचा पुढाकार.

युवा-युवतींनी सादर केली मल्लखांबचे प्रात्यक्षिके.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः शहरातील केडगाव उपनगर भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगर-पुणे महामार्गावरील अर्चना हॉटेल समोरील चौकात सुमारे 101 फुटाचा शिवस्वराज्य ध्वज केडगाव ग्रामस्थ व युवा वर्गाच्या वतीने मोठ्या उत्साही वातावरणात उभारण्यात आला. याप्रसंगी युवक-युवतींनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर केली. कार्यक्रमानिमित्त युवा-युवतींनी मल्लखांबाची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली तर कार्यक्रमानिमित्त पारंपारिक वाद्य वाचून शिवस्वराज्य ध्वजाचे मा.स्वतंत्र सैनिक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन पटावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment