शिवाजीराव कर्डिले-शशिकांत गाडेंमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 7, 2022

शिवाजीराव कर्डिले-शशिकांत गाडेंमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू.

 शिवाजीराव कर्डिले-शशिकांत गाडेंमध्ये श्रेयवादाचे राजकारण सुरू.

बाजार समिती सोसायटी निवडणुकीचा बिगुल वाजला.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः नगर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती व विविध कार्यकारी सोसायटीची निवडणुका जवळ आल्या आहेत. यावरून नगर तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डिले व शिवसेनेचे अहमदनगर जिल्हा दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यात श्रेयवादाचे राजकारण सुरू झाले आहे. नगर तालुक्यातील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक आला आहे. लवकरच या बाजार समितीची निवडणूक होणार आहे. त्याआधी तालुक्यात सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुका टप्प्या टप्प्याने होत आहेत. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात माजीमंत्री शिवाजी कर्डिले व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांच्यात सेवा सोसायट्या आपल्या आसल्याचे दाखवत निवडणूक झालेल्या सोसायटीच्या सदस्यांचा सत्कार घडवून आणत श्रेयासाठी चढाओढ सुरू आहे.
विशेष म्हणजे काही सोसायटीच्या सदस्यांचा दोन्ही गटांनी सत्कार करुन ही सोसायटी आपल्या गटाची असल्याचा दावा केला आहे. दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समिती जिल्ह्यात सर्वात मोठी बाजार समिती आहे. या बाजार समितीच्या माध्यमातून तालुक्याचे राजकारण सातत्याने ढवळून निघते. बाजार समितीवर अनेक वर्षांपासून कर्डिले यांच्या समर्थकांची सत्ता आहे. शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांना राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेसह इतर पक्षांच्या नेत्यांचा विरोध आहे. बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा विरोध अधिक टोकाला गेला असून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली. मात्र, संचालक मंडळाची चौकशी सुरू असल्याचे कारण सांगत जिल्हा उपनिबंधकांनी मुदतवाढ रद्द करुन बाजार समितीवर प्रशासक नियुक्त केला आहे. सेवा सोसायट्याच्या निवडणुका झाल्यानंतर बाजार समितीच्या निवडणुका होणार आहेत.
सध्या नगर तालुक्यात सेवा सोसायटीच्या टप्प्या टप्प्याने निवडणुका होत आहेत. काही ठिकाणी मतदान, तर काही ठिकाणी सोसायटीच्या संचालक बिनविरोध केले जात आहेत. नगर तालुक्यात बाजार समितीच्या निवडणुकाच्या पाश्वभूमीवर निवडणूक झालेल्या सोसायटीच्या संचालक मंडळाचा सत्कार करुन ती सोसायटी आपल्या ताब्यात असल्याचे सांगण्यासाठी कर्डिले व शशिकांत गाडे गटात चढाओढ लागली आहे. काही सोसायटीच्या संचालकांचा तर दोन्ही गटांनी सत्कार केल्याचे पहायला मिळते. नगर तालुक्यात सोसायटीच्या श्रेयवादाची मात्र लोकांत जोरदार चर्चा आहे.
सोसायटीच्या सदस्यांचा सत्कार करुन सोसायटी आपल्या ताब्यात असल्याचे दाखवले जात असले तरी काही सोसायटीच्या सदस्यांना मात्र स्वतः होऊन “आपण कोणत्या गटाचे” हे स्पष्ट करावे लागत आहे. रतडगाव (ता. नगर) येथील सोसायटीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचाही गाडे गटाच्या कार्यकर्त्यांनी सत्कार केला होता. शेवटी त्या सदस्यांना आम्ही शिवाजी कर्डिले गटाचे आहोत हे सांगण्याचे पत्र द्यावे लागले आहे. सध्या तालुक्यातील सेवा सोसायट्या बिनविरोध करण्यावर राजकीय गटांचा भर आहे. मात्र, ही सोसायटी आपल्याच गटाची आहे. हे भासवून राजकीय नेत्यांना चालबाजी करून फसवणारे कार्यकर्ते या निमित्ताने उघडे पडत आहेत.

No comments:

Post a Comment