टाकळीभान येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त; संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 7, 2022

टाकळीभान येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त; संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई.

 टाकळीभान येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्डे उद्ध्वस्त; संदीप मिटके यांच्या पथकाची कारवाई.

1,28,750/- रुपयांचा मुद्देमाल जप्त, 3 आरोपी ताब्यात.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील गावठी हातभट्टयांवर डीवायएसपी संदीप मिटके यांचे नेतृत्वाखाली पोलीस पथकाने छापा टाकून 1 लाख 28 हजार रुपये दारू भट्टीचे रसायन व गावठी दारू जप्त करून प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त केला असून सर्व आरोपींविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिरसाठ यांचे फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड) (ई)  प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, आज दि. 07 रोजी डीवायएसपी संदीप मिटके यांना गुप्त बातमीदार मार्फत श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभान येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व  हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी टाकळीभान परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन, तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला.
आरोपी लक्ष्मण परसराम बिरसने रा टाकळीभान तालुका श्रीरामपूर  45,500/-  रु. कि.चे 650 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 1500/- रू किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.), आरोपी. शांताबाई गणपत जाधव रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर 42,000/-  रु. कि.चे 600 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 1500/- रू  किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं.  अं.), आरोपी. आशाबाई शिवाजी पवार रा. गावठाण टाकळीभान तालुका श्रीरामपूर 36,700/-  रु. कि.चे 525 लिटर  गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं. अं.) 1500/- रू  किमतीची 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू ( आंबट उग्र वासाची किं. अं.) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अचानक झालेल्या या कारवाईमुळे टाकळीभान परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून या कारवाई चे टाकळीभान येथील महिलांनी डीवायएसपी संदीप मिटके व त्यांचे पथकाचे कौतुक  करून आभार व्यक्त केले. ही कारवाई मनोज पाटील  पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर  यांचे मार्गदर्शनाखाली संदीप मिटके,  राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, नितीन शिरसाठ आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment