छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन आरोप-प्रत्यारोप. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 7, 2022

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन आरोप-प्रत्यारोप.

 छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या लोकार्पणावरुन आरोप-प्रत्यारोप.

छत्रपतींच्या मुर्तीची उंची वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू- आ. जगताप

 शिवप्रेमींची दिशाभूल केली- शिवसेना । राष्ट्रवादी आमदारांनी शिवप्रेमींची माफी मागावी - काँग्रेस


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मूर्तीची उंची वाढविण्यासाठी लवकरच शासनाकडे पाठपुरावा करणार असून नगर शहराच्या विकासाची पायाभरणी करताना छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार युवकांनी अंगीकारावे असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.
शहरातील माळीवाडा बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा काल पार पडला या प्रसंगी ते बोलत होते. अहमदनगर शहराचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या नुतनीकरण केलेल्या पूतळ्याचे अनावरण करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या प्रमाणेच धर्मवीर संभाजी महाराज आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामनवांचे पूर्णकृती पुतळे लवकरच शहरात उभारणी करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप  याप्रसंगी म्हणाले.
गेल्या पंधरा दिवसांत मूर्तीचे नाविन्यपूर्ण काम पूर्णत्वास आले. जागेवरच मूर्तीला आडोसा करून काम सुरू करण्यात आले होते. अमेरिकेत शिल्पकलेचे विशेष प्रशिक्षण घेतलेले नगरचे प्रसिध्द शिल्पकार विकास कांबळे यांनी आता आहे त्याच मूर्तीवर काम करत मूर्तीला आकर्षक नावीन्य दिले आहे. यासाठी त्यांनी अमेरिकन पॉलिस वापरले आहे. आत ही मूर्ती अगदी नव्या रुपात झळाळी असलेली दिसत आहे. काल हा भव्य शिवतीर्थ सोहळा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. महापौर शेंडगे यावेळी उपस्थित होत्या. यावेळी बोलताना आ.संग्राम जगताप यांनी लवकरच शासकीय मंजुरी घेऊन शहरात छत्रपती संभाजी महाराज आणि घटनाकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येईल असे सांगितले. कार्यक्रम महानगरपालिकेचा की राष्ट्रवादीचा!! कार्यक्रमा नंतर आता या चर्चेला समाजमाध्यमात सुरुवात झाली आहे. महानगरपालिका निधीतून आयुक्तांच्या परवानगीने हे मूर्ती सुशोभित करण्यात आलेली असताना संपूर्ण कार्यक्रमावर छाप राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.संग्राम जगताप यांची का असा प्रश्न चर्चेत येत आहे. मनपात सत्तेत असलेल्या शिवसेने डून काहींनी हा प्रश्न समाजमाध्यमात उपस्थित केल्याचे दिसून येत आहे.
माळीवाडा बसस्थानका जवळच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातील काल संपन्न झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमावरून राजकीय गदारोळ सुरू झाला असूने हा कार्यक्रम राष्ट्रवादीने हायजॅक करून शिवप्रेमींची दिशाभूल केल्याचा आरोप शिवसेनेन केला असून काँग्रेस पक्षाच्या वतीने ही छत्रपतींचे नाव घेऊन शिवप्रेमींची फसवणूक केल्याचा आरोप करत राष्ट्रवादीच्या आमदारांनी शिवप्रेमींची माफी मागावी अशी मागणी केली आहे.
या कार्यक्रमानंतर आता सोशल मीडियावर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असे युद्ध रंगले आहे अहमदनगर महानगरपालिकेत सध्या शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीचे राज्य असून महानगरपालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या रोहीणी शेंडगे महापौर आहेत आजचा कार्यक्रम हा महानगरपालिकेच्या खर्चातून झाला असून या कार्यक्रमाला शिवसेनेच्या महापौरांना तब्बल एक तास वाट बघावी लागली तसेच महानगरपालिकेचा कार्यक्रम असूनही राष्ट्रवादीच्या आमदारांचे बोर्ड लावण्यात आले असल्याने या प्रकाराचा निषेध शिवसेनेच्या फेसबुक पेज वरून करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम नेमका अखंड हिंदू समाजाचा होता का राष्ट्रवादीचा होता असा सवालही या फेसबुकवर करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्यक्रमानंतर आता शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असं फेसबुक युद्ध पेटल आहे.
अहमदनगर शहराच्या प्रथम नागरिक महापौर रोहिणी शेंडगे यांच्यासह शिवसेनेच्या नगरसेवकांनी पदाधिकार्‍यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. अखंड हिंदू समाजातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे सांगण्यात येत होते. आयोजकांनी कार्यक्रम अत्यंत देखना केला मात्र कार्यक्रम संपल्यानंतर हिंदी चित्रपटातील हिडीस गाणी लावली. त्यामुळे या कार्यक्रमाला गालबोट लागलं आहे कारण या कार्यक्रमाला अनेक महिला मुली आपल्या कुटुंबीयांसमवेत या ठिकाणी आल्या होत्या. मात्र चुम्मा चुम्मा दे दे असे गाणे लावून या अशा अत्यंत चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. अशा हिडीस गाण्यावर तरुणांनी नाच केला खरा मात्र यामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारांना कुठेतरी तडा गेला होता आयोजकांनी या कार्यक्रमात पोवाडे अथवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाथा लावल्या असत्या तर निश्चितच या चांगल्या कार्यक्रमातुन एक वेगळे वातावरण याठिकाणी निर्माण झाले असते. मात्र मध्येच काही हिंदी चित्रपटातील विचित्र गाणे लावून त्यावर तरूण नृत्य करत असल्यामुळे अनेकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली त्या देखण्या कार्यक्रमाला अशा चुकीच्या गाण्यांमुळे गालबोट लागलं हे नक्कीच.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर काल पोवाडे लावण्या ऐवजी चुम्मा, चुम्मा सारखी किळसवाणी अश्लील गाणी वाजविण्यात आली. या गाण्यावर स्वतः आमदार कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बसून नाचत होते. तसा व्हिडिओच काँग्रेसने समाज माध्यमांवर व्हायरल केला आहे. राजकीय पोळी भाजणार्‍या आमदारांना याची थोडी तरी लाज वाटायला हवी होती, असे म्हणत काँग्रेसने राष्ट्रवादी आमदारांच्या या कृतीला विकृत कृत्य म्हणत तीव्र निषेध केला आहे.
ज्यांच्या मनपा सत्ताकाळात धर्मवीर संभाजी महाराज यांचा प्रोफेसर कॉलनी चौक येथे शिवप्रेमींनी बसवलेला पुतळा भर चौकातून काढून नेण्यात आला, त्यांनीच छत्रपतींचे नाव घेत दिशाभूल करुन शिवप्रेमींची गर्दी जमवत तमाम शिवप्रेमींची फसवणूक केली आहे. ही फसवणूक खपवून घेतली जाणार नाही. महाराजांसमोर चुम्मा, चुम्मा सारख्या अश्लील गाण्यावर नाच करणार्‍या आणि तमाम शिवप्रेमींची फसवणूक करणार्‍या शहराच्या आमदारांनी महाराजांच्या पुतळ्यासमोर नाक रगडून माफी मागावी, अशी मागणी अहमदनगर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment