कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायींची सुटका. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायींची सुटका.

 कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायींची सुटका.

नगर तालुका पोलिसांची कारवाई.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः  कत्तलीसाठी आणलेल्या 18 गायीची सुटका करून ट्रकसहित 13 लाख 34 हजार किमतीचा मुद्देमाल पकडण्याची कारवाई नगर तालुका पोलिसांनी केली आहे. नगर तालुक्यातील भातोडी पारगाव शिवारात कत्तलीसाठी गाई आल्याची गोपनीय माहिती नगर तालुका पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी छापा टाकून 1 मोठा ट्रक व 18 गाई ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. सुटका केलेल्या गाईंना गोशाळेत देण्यात आले असून, ट्रक जप्त करून आरोपींवर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुरन 89/22 महाराष्ट्र पशु संरक्षण आधी 1995 कलम 5 अबक ब प्राण्यांना निर्दयतेने वागवणे कलम 3,11 प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे. गुन्ह्यात शाहरुख सादिक सयद (रा मालिचिंचोरा नेवासा) व रिजवान नियाज पठाण (रा चांदा नेवासा) याना अटक केलेली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर ग्रामीण उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप, पोसई बोराडे, एएसआय घोरपडे, हेपोकॉ खेडकर, पोना घोडके,पोना बांगर,पोना वणवे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

No comments:

Post a Comment