आरोपींच्या घरात गावठी पिस्तूल बनविण्याचा कारखाना. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 22, 2022

आरोपींच्या घरात गावठी पिस्तूल बनविण्याचा कारखाना.

 आरोपींच्या घरात गावठी पिस्तूल बनविण्याचा कारखाना.

राहुरी माजी नगरसेविका सोनाली बर्डे-माळी गोळीबार हल्ला प्रकरण.
आरोपींनी खंडणी, वसुली, जागा बळकावली असल्यास फिर्याद द्यावी- पोलीस उपमहानिरीक्षक.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी

अहमदनगर ः महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डेची यांची कन्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे माळी यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करणार्‍या अंकुष नामदेव पवार याने ह्यासाठी वापरलेले गावठी पिस्तूल स्वतः तयार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून अंकुश पवार यांनी राहुरीत स्वतःच्या घरीच गावठी पिस्तूल तयार करण्याचा उद्योग केला असून गावठी पिस्तूल बनविण्यासाठी लागणारी उपकरणे, वापरलेले पिस्तूल जप्त केले आहे. घरगुती भांडणातून हा प्रकार घडला आहे. आरोपी गावठी पिस्तूल बनवून त्याची विक्री करतो की नाही, पिस्तुलाला लागणार्‍या गोळ्या कशी तयार करतो, याची सखोल माहिती घेण्यात आली. खंडणी वसूल करणे, जागा बळकावणे, अशा प्रकारची कृत्ये आरोपींकडून झाली असल्यास पीडित नागरिकांनी पोलिस ठाण्याशी संपर्क करून फिर्याद द्यावी, असे आवाहन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक बी.जे.शेखर पाटील यांनी केले आहे.
राहुरी येथे काल रात्री नाशिक परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी अचानक भेट दिली. गावठी पिस्तुलातून झालेल्या गोळीबाराच्या घटनास्थळाची व आरोपीच्या घराची पाहणी केली. आरोपींची कसून चौकशी केली. आरोपींचे पूर्वीचे गुन्हे तपासून कडक कारवाई केली जाईल, असे शेखर पाटील यांनी सांगितले. राहुरी येथे शुक्रवारी (ता. 18) दुपारी एक वाजता ग्रामीण रुग्णालयासमोरील एकलव्य वसाहतीत महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे यांची कन्या माजी नगरसेविका सोनाली बर्डे-माळी यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार झाला. त्यांच्या हाताच्या कोपराखाली गोळी घुसली. नगर येथे खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करून काढलेली गोळी पोलिसांनी ताब्यात घेतली. घटनेच्या दिवशी तीन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या घरांची झडती घेतल्यावर पोलिसांना गावठी पिस्तूल तयार करण्याचा कारखाना आढळला. त्याचा स्वतंत्र गुन्हा नोंदविण्यात आला.घटनेची पोलिस उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांनी गंभीर दखल घेतली. त्यांच्यासमवेत पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. उपस्थित महिला व नागरिकांशी संवाद साधून आरोपींच्या घरात जाऊन पाहणी केली. पत्रकारांशी बोलताना शेखर पाटील म्हणाले, की अंकुश नामदेव पवार याने सोनाली बर्डे यांच्यावर गावठी पिस्तुलातून गोळीबार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी अंकुशसह अन्य दोन जणांना अटक केली. आरोपींकडून वेगवेगळी माहिती मिळविली. आरोपीने स्वतःच्या घरीच गावठी पिस्तूल तयार केले. ते कसे तयार केले, याची उत्सुकता आम्हाला होती.

No comments:

Post a Comment