मनपा कर्मचार्‍यांचे 28 फेब्रु.ला बेमुदत धरणे आंदोलन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 22, 2022

मनपा कर्मचार्‍यांचे 28 फेब्रु.ला बेमुदत धरणे आंदोलन.

 मनपा कर्मचार्‍यांचे 28 फेब्रु.ला बेमुदत धरणे आंदोलन.

अखेर मनपा कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महापालिका कर्मचार्‍यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. राज्यातील इतर महापालिकांमधील कर्मचार्‍यांचे हे प्रश्न सुटलेले असताना अहमदनगरमध्ये मात्र त्यावर कार्यवाही झाली नाही. विशेषतः सहाव्या वेतन आयोगाचा फरक मिळाला नाही, सातवा वेतन आयोग लागू नाही. यासह महत्त्वाच्या अन्य 12 मागण्यांसाठी वारंवार महापालिका प्रशासन, तसेच शासन दरबारी पाठपुरावा केला, परंतु मागण्या मागण्या होत नाहीतअखेर मनपा कर्मचार्‍यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. येत्या 28 फेब्रुवारी रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्यास हे कर्मचारी तयार झाले आहेत. याबाबत आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे.
यातील बहुतेक मागण्या मान्य होण्यासाठी शासनस्तरावर मनपा प्रशासनानेही पाठपुरावा करणे आवश्यक आहे. या सर्व मागण्यांसाठी महापालिका कामगार संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर आदी शासनदरबारी प्रयत्न करीत आहेत.
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात. वारसांना लाड समितीच्या शिफारशीनुसार वारसा हक्काने सेवेत समावून घ्यावे. कोरोनात मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍यांना 50 लाखांची नुकसान भरपाई मिळावी. सफाई कर्मचार्‍यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा. पात्र कर्मचार्‍यांना पदोन्नती मिळावी. परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्र झालेल्या कर्मचार्‍यांना वेतनवाढ मिळावी. आरोग्य विभागात आर.सी.एच. योजनेतील कर्मचार्‍यांना सेवेत समावून घ्यावे. हद्दवाढीतील कर्मचार्‍यांना पाचव्या वेतन आयोगाचा फरक मिळावा. कालबद्ध पदोन्नती लागू करण्यात आलेल्यांचा फरक मिळावा. स्त्री कर्मचार्‍यांना गणवेश मिळावा. महापालिका कर्मचार्‍यांच्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यासाठी आम्ही शासनदरबारी पाठपुरावा करीत आहोत. मागण्यांबाबत मनपा प्रशासनाने योग्य पाठपुरावा केला नाही, तर कर्मचारी आंदोलन करणार आहेत.

No comments:

Post a Comment