दोन चंदन तस्कर गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

दोन चंदन तस्कर गजाआड.

 दोन चंदन तस्कर गजाआड.

कोतवाली पोलीसांची धडाकेबाज कारवाई.
सुमारे 18.96.890/- किंमतीचा मुद्देमाल जप्त.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः आज सकाळी पहाटे 3 च्या दरम्यान सुभाष भिमराज दिलवाले (वय 47 वर्षे) राजेंद्र रंगनाथ सासवडे (वय 37 वर्षे) रा. दोघेही चिंचोडी पाटील या चंदन तस्करांवर कारवाई करत कोतवाली पोलिसांनी 11,84,000 रु. किमतीचे चंदन, इनोव्हा कार सह, विवो व जिओ कंपनीचा मोबाईल रोख रक्कम असा 18,96,890 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की आज रोजी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक संपतराव शिंदे यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चंदनाचे सुगंधीत वृक्ष तोडण्यास बंदी असताना देखील दोन इसम चंदनाचे वृक्ष बेकायदेशीर तोडुन चोरुन आणलेले सुगंधीत चंदनाचे लाकडाचे तुकडे हे त्यांचे कडील इनोव्हा गाडीमध्ये भरुन वाहतुक करुन विक्री करणे कामी नगर शहरातील उड्डान पुलाचे काम चालू असल्याने ते नगर शहरातून जाणार आहेत व आत्ता जावुन सापळा लावल्यास ते मिळुन येतील अशी बातमी मिळाल्याने पोनि.श्री.संपतराव शिंदे सो यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना सदर ठिकाणी सापळा लावून कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेश दिला. पथकाने चांदणी चौक ते जुने कलेक्टर ऑफीस कडे जाणारे रोडवर सैनिक लॉन गेट समोरच्या परीसरात रोजी पहाटे 01/00 वा पासुन सापळा लावला असता चांदणी चौकाकडुन त्यांच्या दिशेने पहाटे 03/30 वा चे सुमारास बातमीतील वर्णनाची एक राखाडी रंगाची इनोव्हा गाडी येताना दिसली असता पथकाने गाडीचे चालकास थांबण्याचा इशारा दिला असता त्याने त्याचे ताब्यातील इनोव्हा गाडी ही रोडच्या कडेला बॅरीकेट च्या जवळ थांबवली असता तीचा क्रं हा चक 12 गण 5644 असा असलेला दिसला त्या नंतर गाडीतील इसमास खाली उतरण्यास सांगीतले असता गाडीतील दोन इसम हे खाली उतरले त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव सुभाष भिमराज दिलवाले वय 47 वर्ष व गाडीचा चालक, राजेंद्र रंगनाथ सासवडे वय 30 वर्ष दोघे रा चिचोंडी पाटील ता नगर जि अहमदनगर असे सांगीतले पंचासमक्ष त्याचे कडील इनोव्हा गाडीची व त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 7,00,000/- रु किं ची एक राखाडी रंगाची इनोव्हा गाडी क्रं चक 12 गण 5644 असा असलेला जु.वा. किं. अं 2) 11,84,000 /- रु किमतीचे काळे, पिवळे, पांढरे रंगाचे प्लास्टीकच्या 17 गोणी मध्ये भरलेले सुगंधीत वृक्ष चोरुन वेकायदेशीर तोडुन चंदनाचे लाकडाचे तुकडे त्याचे वजन अंदाजे 370 किलो व त्याचा भाव अंदाजे, 3200 रुपये प्रती किलो प्रमाणे अंदाजे, 10,000/- रु किं चा एक निळे रंगाचा वीवो कंपनीचा मोबाईल फोन त्याचा खचएख 860398044091697 व एक काळे रंगाचा जिओ कंपनीचा मोबाईल फोन जुवाकिंअं 2890/- रु रोख रक्कम सुभाष भिमराज दिलवाले याचे अंगझडतीत मिळाली त्यात विविध दराच्या चलनी नोटा. एकुण 18,96,890/- (अठरा लाख शहाण्णव हजार आठशे नव्द रुपये) मुद्देमाल आढळून आला.
मुद्देमालासह आरोपी मिळुन आल्याने त्याना ताब्यात घेवून आरोपींना अटक करण्यात आली आहे व त्याचे विरोधात पोना/योगेश भिंगारदिवे यांच्या फिर्यादी वरुन कोतवाली पोलीस स्टेशन येथे भारतीय वन अधिनीयम 1927 चे कलम 49,42,66,66 (अ) व महाराष्ट्र नियमावली 2014 नियम 82 व महाराष्ट्र अधिनीयम कलम 29 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास हा पोना/गणेश धोत्रे हे करीत आहेत
ही कारवाई मा. पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक संपतराव शिंदे, गुन्हे शोध पथकाचे पोना/योगेश भिंगारदिवे, पोना/गणेश धोत्रे, पोना/नितीन शिंदे, पोना/सलिम शेख, पोना/संतोष गोमसाळे, पोना/ सागर पालवे, पोना/राजु शेख, पोकॉ/अभय कदम, पोकॉ/दिपक रोहकले, पोकॉ/ अमोल गाढे, पोकॉ/ सोमनाथ राउत, पोकॉ/अतुल काजळे तसेच चापोहेकॉ/बाबासाहेब तागड, पोकॉ/प्रशांत बोरुडे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment