शनिवार ते सोमवार शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

शनिवार ते सोमवार शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत.

 शनिवार ते सोमवार शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत.

पाणी जपून वापरण्याचे मनपा प्रशासनाचे आवाहन.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शनिवार दि.26/2/2022 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी कडून 33 के.व्ही मुळा डॅम वाहिनीचे फिडर शिफ्टींग दुरुस्ती कामासाठी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत शर्ट डाउन घेण्यात येणार आहे. या वेळेत अहमदनगर महानगरपालिकेचे मार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत’ पाणीपुरवठा योजनेची महत्त्वाची कामे कार्यरत शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्वाची दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे बोल्हेगाव, नागापूर, सावेडी, उपनगरातील गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, लक्ष्मी नगर, सुर्या नगर, निर्मल नगर, मुकुंद नगर तसेच सारस नगर, केडगाव, नगर कल्याण रोड वरील शिवाजीनगर परिसर इत्यादी भागास (सकाळी 11 नंतरच्या पाणीवाटपाच्या भागास) पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. सदर पाणीपुरवठा हा रविवार दि.27 रोजी होणार असल्याचे मनपा पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या शहर पाणीपुरवठा योजनेवरील महत्त्वाची दुरुस्तीची कामे शनिवारी दि.26 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या काळात मुळानगर, विळद येथून होणारा पाण्याचा उपसा बंद राहणार असल्याने शहर पाणी वितरणासाठीच्या टाक्या भरता येणार नाही.
तसेच रविवार दि.27/02/2022 रोजी रोटेशन नुसार पाणी वाटपाच्या शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजे सिद्धार्थनगर, लाल टाकी, तोफखाना, दिल्ली गेट, नालेगाव, चितळे रोड, आनंदी बाजार, कापड बाजार, पंचपीर चावडी, जुने मनपा कार्यालय परिसर, माळीवाडा, बालिकाश्रम रोड परिसर व सावेडी इत्यादी भागात महानगरपालिकांमार्फत पाणीपुरवठा करण्यात येणार नाही. या भागातील पाणीपुरवठा रविवारी ऐवजी सोमवार दि.28/2/2022 रोजी करण्यात येणार आहे.
सोमवार दि.28 रोजी पाणीपुरवठा होवू घातलेल्या मंगल गेट, रामचंद्र खुंट, झेंडीगेट, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, डाळ मंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, बंगाल चौक, माळीवाडा, कोठी या भागात व गुलमोहर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको इत्यादी भागात पाणीपुरवठा होणार नसून तो मंगळवार दि.01 रोजी करण्यात येणार आहे. शहरातील पाणीपुरवठा एक दिवस बंद करून उपनगराच्या भागात जास्त दिवसाचे रोटेशन आलेले अशा भागात पाणीपुरवठा करण्याचा महानगरपालिकेचा माणस आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घेऊन असलेल्या पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

No comments:

Post a Comment