नैतिकतेच्या आधारावर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा - अ‍ॅड. आगरकर - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

नैतिकतेच्या आधारावर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा - अ‍ॅड. आगरकर

 नैतिकतेच्या आधारावर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा - अ‍ॅड. आगरकर

नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाची निदर्शने.
मलिक यांचेवर बेहिशोबी मालमत्ता. दाऊदशी संबंध, आर्थिक हितसंबंध तपासल्यावर ‘ईडी’कडून अटक.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नवाब मलिक यांच्यावर बेहिशेबी मालमत्ता, दाऊदशी हितसंबंध, आर्थिक हितसंबंध अशा सर्व गोष्टी तपासल्यावरच ईडीने मलिक यांना अटक केली असून नैतिकतेच्या आधारावर नवाब मलिक यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावा. अन्यथा यापेक्षा तृीव्य स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.अभय आगरकर यांनी दिला आहे.
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी ईडीने अटक केलेल्या राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी शहर जिल्हा भाजपाच्यावतीने दिल्लीगेट येथे निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी अ‍ॅड.अभय आगरकर म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्री सत्तेचा दुरोपयोग करुन स्वत:ची तिजोरी भरत आहे. त्यामुळेच एक-एक मंत्री अनेक घोटाळ्यात अडकत आहे, या भ्रष्टमंत्र्यांची जेलवारी सुरु झाली असून, या पुढील काळातही आणखी काही भ्रष्टमंत्री जेलमध्ये गेलेले दिसतील. मंत्री नवाब मलिक यांचे देशद्रोही अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचे उघड झाले आहे, त्यांच्यात झालेल्या व्यवहाराचा पर्दाफास ईडीने केला आहे. अशा भ्रष्ट व देशद्रोह्यांशी संबंध असणार्या मंत्र्याला पदावर राहण्याचा काहीएक अधिकार नाही.
याप्रसंगी सुनिल रामदासी म्हणाले, नवाब मलिक यांना पुर्ण पुराव्यानिशी अटक केली आहे, तरीही महाविकास आघाडी सरकार नवाब मलिक यांना पाठिशी घालत आहे. नैतिकदृष्ट्या मंत्री म्हणून पदावर राहण्याचा त्यांना कोणताच अधिकार नाही, तेव्हा त्यांनी राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना काढून टाकावे, अशी मागणी केली. यावेळी कार्यकर्त्यांनी नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणा बाजी केली, महाविकास आघाडी म्हणजे गुंडांची टोळी, आघाडी सरकारचा निषेध असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
याप्रसंगी सरचिटणीस तुषार पोटे, विधानसभा प्रमुख शशांक कुलकर्णी, उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिन पारखी, शिवाजी दहिंडे, जगन्नाथ निंबाळकर, नगरसेवक भैय्या परदेशी, बाबासाहेब गायकवाड, पंकज जहागिरदार, चंद्रकांत पाटोळे, राजु मंगलाराम्, अमोल निस्ताने, सुमित बटुळे, सुजित खरमाळे, आदेश गायकवाड, ज्ञानेश्वर धिरडे, ऋग्वेद गंधे, हुजेफा शेख, ज्योती दांडगे आदिंसह भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीनं अटकेची कारवाई केली आहे. त्यानंतर आता मलिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा यासाठी शहर जिल्हा भाजपतर्फे निदर्शने करण्यात आली. निदर्शनांमध्ये नवाब मलिक आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना काल अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीकडून अटक करण्यात आली. ही कारवाई सूडबुद्धीने केल्याचे आणि राज्य सरकार पाडण्याच्या उद्देशाने झाल्याचे सांगत राष्ट्रवादीतर्फे बुधवारपासून राज्यभरात आंदोलन सुरू आहेत. त्याचा निषेध करण्यासह नवाब मालिकांनी मंत्रिपदाचा राजीनामा देण्याच्या मागणीसाठी आज भाजपतर्फे सर्वत्र आंदोलन करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment