न्यायालयाने शिक्षा ठोठावली फरार आरोपी पुन्हा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

न्यायालयाने शिक्षा ठोठावली फरार आरोपी पुन्हा गजाआड.

 न्यायालयाने शिक्षा ठोठावली फरार आरोपी पुन्हा गजाआड.

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः लक्ष्मी नगर सहकारी नागरी पतसंस्थेची फसवणूक करणारा व न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर फरार झालेला आरोपी दीपक भारत सावेकर रा.आनंदी बाजार गांधी मैदान यांस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शोध घेऊन त्यास ताब्यात घेवून अतिरिक्त न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले आहे.
संक्षिप्त फौजदारी खटला 6350/2018 लक्ष्मीनारायण सहकारी नागरी पतसंस्था विरुध्द दिपक भारत सावेकर एन.आय. अ‍ॅक्ट कलम 138 मधील आरोपी नामे दिपक भारत सावेकर रा. आनंदी बाजार, गांधी मैदान, अहमदनगर यास दोषी ठरवुन एक वर्ष कारावास व आठ लाख रु. नुकसान भरपाई व नुकसान भरपाई न दिल्यास सहा महिने साध्या कारावास अशी मा. श्री. ज्ञा. र. दंडे, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्र. 10, अहमदनगर न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. आरोपीस शिक्षा सुनावल्या पासुन आरोपी फरार झाला होता. सदर प्रकरणी मा. न्यायालयाने आरोपी समक्ष हजर ठेवणे बाबत क्रिमिनरल प्रोसिजर कोड कलम 75 प्रमाणे नॉनबेलेबल वॉरंट काढुन दोषसिध्द आरोपीस कारागृहात पाठविणे करीता तात्काळ ताब्यात घेणे बाबत आदेश दिले होते.
मनोज पाटील, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी नमुद आदेशाची गांभियाने दखल घेवुन पोनि / श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आरोपी नामे दिपक भारत सावेकर रा. आनंदी बाजार, गांधी मैदान, अहमदनगर याचा शोध घेवुन तात्काळ मा. न्यायालया समोर हजर करणे बाबत सुचना व मार्गदर्शन केले. नमुद सुचना व मार्गदर्शन प्रमाणे पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार यांचे स्वतंत्र पथक नेमले होते. त्या प्रमाणे पथकातील पोहेकों/संदीप घोडके, संदीप पवार, फकिर शेख, पोना/शंकर चौधरी, रवि सोनटक्के, लक्ष्मण खोकले, दिपक शिंदे, देवेंद्र शेलार, पोकॉ/ योगेश सातपुते व कमलेश पाथरुट असे सदर आरोपीचा शोध घेत असताना पोनि / श्री. अनिल कटके यांना गुप्तबातमीदारा माहिती मिळाली की आरोपी दिपक सावेकर हा त्याचे राहते घरी येणार आहे अशी खात्रीशिर माहिती मिळाल्याने स्थागुशा पथकातील अंमलदार यांनी नमुद ठिकाणी जावुन आरोपीस ताब्यात घेवून मा. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्रमांक 10, अहमदनगर यांचे समोर हजर केले आहे. ही कारवाई ही मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व संजय सातव साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब, शिर्डी विभाग, शिर्डी यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment