पळालेल्या आरोपीला पुन्हा ठोकल्या बेड्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Saturday, February 19, 2022

पळालेल्या आरोपीला पुन्हा ठोकल्या बेड्या.

 पळालेल्या आरोपीला पुन्हा ठोकल्या बेड्या.

तोफखाना पोलिसांची कारवाई.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः खूनाच्या प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आकाश बाळू गायकवाड याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये खून करण्याचा प्रयत्न करणे या कलमाखाली गुन्हा दाखल आहे या प्रकरणात तो सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात आणले होते मात्र या ठिकाणाहून त्याने पोलिसांचे लक्ष विचलित करून पळ काढला होता. आकाश गायकवाड हा पळून गेल्यामुळे शहरातील सर्वच पोलीस त्याचा शोध घेत होते मात्र काही तासातच ,तोफखाना पोलिसांनी आकाश गायकवाड याचा शोध घेतला आहे.
आकाशच्या शोधासाठी तोफखाना पोलीस स्टेशनसह शहरातील सर्वच पोलिस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी शोध घेत होते रेल्वे स्टेशन, बस स्थानक तसेच शहरातून बाहेर जाणार्‍या प्रत्येक ठिकाणी पोलीस आकाश गायकवाड याचा शोध घेत असताना तोफखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मुजावर आणि पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, तसेच तोफखाना पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाच्या कर्मचार्‍यांनी आकाश गायकवाड यास नोबेल हॉस्पिटल परिसरातून ताब्यात घेतले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here