स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांचे नुतनिकरण, सुशोभिकरण करा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांचे नुतनिकरण, सुशोभिकरण करा.

 स्वातंत्र्यसैनिकांच्या पुतळ्यांचे नुतनिकरण, सुशोभिकरण करा.

कोरोना प्रादुर्भावामुळे शहरातील थोर पुरुषांच्या पुतळ्यांकडे दुर्लक्ष; हरियाली संस्थेचे आयुक्तांना निवेदन.
काही पुतळ्यांची पॉलीश गेली.. कारंजे बंद.. सुशोभीकरणाची पडझड..


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः नगर शहरात राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर, पंडीत नेहरु, सेनापती बापट, रावसाहेब पटवर्धन, भगतसिंग, तात्या टोपे, महात्मा फुले, हिराबाई भापकर, आण्णाभाऊ साठे या सह, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान गौतम बुध्द, स्वामी विवेकानंद आदी महापुरुषांचेही पुतळे महापालिका कार्यक्षेत्रात आहेत. परंतु गेले दोन वर्षापासुन कोरोनोच्या पार्श्वभुमीवर अहमदनगर महानगरपालीकेच्या माध्यमातुन या स्वातंत्र्यसैनिकांचे साजरे होणारे जयंती व पुण्यतिथिचे अधिकृत कार्यक्रम बंद आहेत.त्यामुळे या पुतळ्याकडे दुर्लक्ष झाले असुन या ठीकाणचे सर्व कारंजे बंद स्थितीत आहेत.तर काही ठीकाणी सुशोभिकरणाची पडझड झालेली असुन अस्वच्छता निर्माण झालेली आहे.यातील काही पुतळ्यांची पॉलीश गेली असुन त्यांची दुर्दशा झालेली आहे. हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष असल्याने सदरील पुतळ्यांचे नुतनिकरण व सुशोभिकरण करावे अशी मागणी हरियाली संस्थेचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनीे महानगरपालीका आयुक्त शंकर गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळुन देण्या-या.थोर स्वातंत्र्यसेनानींच्या स्मृती जागृत रहाव्यात यासाठी त्यांचे पुतळे अहमदनगर शहरात महापालिकेच्या वतीने स्थापित करण्यात आले आहेत. हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत मोहत्सवी वर्ष म्हणुन संपुर्ण देशभर साजरे केले जात असुन स्वातंत्र्यसेनानी यांचे स्वातंत्र्य लढ्यातील महत्वपुर्ण योगदानाचे स्मरण करुन त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. म्हणुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त नगरमधिल सर्व स्वातंत्र्यसैनिक व राष्ट्रपुरुषांची जयंती व पुण्यतिथीचे अभिवादनाचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे सुरु करुन पुतळ्यास पॉलीश करुन नुतनीकरण आणि सुशोभिकरण करण्यात यावे तसेच कारंजेही सुरु करावेत अशी मागणी हरियाली संस्थेच्या वतीने महापालिका आयुक्त यांचेकडे हरियालीचे अध्यक्ष सुरेश खामकर, तुलसीराम पालीवाल,ठाकुरदास परदेसी,योगेश गायकवाड, दिपक परदेशी,संजय राहुरकर,संदिप पावसे,विष्णु नेटके,रंगनाथ सुंबे आदिनीं केली आहे.

No comments:

Post a Comment