उद्याच्या राज्यव्यापी संपाला शिक्षक भारतीचा पाठिंबा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 22, 2022

उद्याच्या राज्यव्यापी संपाला शिक्षक भारतीचा पाठिंबा.

 उद्याच्या राज्यव्यापी संपाला शिक्षक भारतीचा पाठिंबा.

काळ्या फिती लावून काम करण्याचे शिक्षक, कर्मचार्‍यांना आवाहन

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी, शिक्षक संघटना समन्वय समितीने 23 व 24 फेब्रुवारी 2022 च्या राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. शिक्षक भारती या समन्वय समितीचा घटक आहे. आमदार कपिल पाटील यांच्या सूचनेनुसार शिक्षक भारतीने या संपाला पाठिंबा जाहीर केला आहे. सर्व शिक्षक, कर्मचार्‍यांनी काळ्या फिती लावून काम करावे, असे आवाहन शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.
शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, राज्यसचिव सुनिल गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी शिक्षक, कर्मचारी यांच्या मागण्या पुर्ण कराव्या असे आवाहन राज्यशासना कडे केले आहे. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा., 100 टक्के अनुदान द्या., शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरा., सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करा., बक्षी समितीचा खंड 2 तातडीने प्रसिद्ध करा.,अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्ह्यातच करा., विषयांना शिक्षक नाकारणारा 28 ऑगस्ट 2015, कला क्रीडा शिक्षकांना हद्दपार करणारा 7 ऑक्टोबर 2015 आणि  रात्रशाळा संकटात टाकणारा 17 मे 2017 चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय मागे घ्या., वस्तीशाळा शिक्षक आणि अप्रशिक्षित शिक्षण सेवक यांना मूळ सेवेपासून वरिष्ठ वेतनश्रेणी  द्या., 20 पटाच्या आतील शाळा बंद करु नका.
सहाय्यक शिक्षक परिविक्षाधिन यांना वेतन श्रेणी लागू करा आणि परिविक्षाधिन कालावधी कमी करा., अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तासिका तत्त्वावर काम करणारे  सर्वच शिक्षकांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा.,संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान सुरु करा., वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट लागू करा., आयटी विषय शिक्षकांना वेतन मंजूर करा.,सावित्रीबाई फुले - फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना लागू करा., शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका., केंद्राप्रमाणे महिला कर्मचार्‍यांना दोन वर्ष बालसंगोपन रजा द्या., खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा.या सर्व मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे.
शिक्षक भरतीचा या संपास जाहीर पाठिंबा आहे. जिल्हाधिकारी यांना या मागणीसाठी निवेदन देण्यात येणार आहे, तरी सर्व शिक्षक व कर्मचार्‍यांनी संपास पाठींबा देउन काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन शिक्षक आमदार कपिल पाटील, शिक्षक भारतीचे राजाध्यक्ष अशोक बेलसरे,  राज्य सचिव तथा शिक्षक नेते सुनील गाडगे यांच्यासह जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप,मोहंमद समी शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, नवनाथ घोरपडे, सुदाम दिघे, संजय पवार, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संजय भुसारी, सिकंदर शेख, रेखन घंगाळे,जॉन सोनवणे,महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुज, छाया लष्करे, जया गागरे, अनघा सासवडकर, सोनाली अकोलकर आदींनी केले आहे.

No comments:

Post a Comment