गोमांस विकणार्‍यांवर गुन्हा दाखल. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 22, 2022

गोमांस विकणार्‍यांवर गुन्हा दाखल.

 गोमांस विकणार्‍यांवर गुन्हा दाखल.

कोतवाली पोलिसांची कारवाई.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गोवंश जनावरांची कत्तल करण्यास मनाई असताना झेंडीगेट परिसरातील सुभेदार गल्लीतील रिजवान जमीर कुरेशी वय 30 वर्ष गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आल्याने त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पशु संरक्षण (सुधारणा) अधिनियम गुन्हा दाखल करून 200 किलोचे गोमांस, सूरा, वजन काटा. लाकडी ठोकळा असे 1,92,500 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, पोना/लक्ष्मण खोकले यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली आहे की, सुभेदार गल्ली, झेंडीगेट, अ.नगर ता जि.अ.नगर येथे सुभेदार मज्जीदच्या पाठीमागे बंदीस्त रुम मध्ये इसम नामे रिझवान कुरेशी रा. सुभेदार गल्ली, अहमदनगर हा महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंशी जनावरांचे कत्तल करुन गोमांस विक्री करण्याची मनाई असतांना ही गोवंशी जातीचे जनावरांची कत्तल विक्री करण्याच्या उद्देशाने करीत आहे. आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी बातमी मिळाल्याने पोहेक/440 संदीप कचरु पवार यानी लागलीच दोन पंचांना स्थानिकगुन्हे शाखा, अहमदनगर कार्यालय येथे बोलवून घेवुन त्यांना बातमीतील हकीकत समजावून सांगून पंचनामा करणे कामी हजर राहण्याची विनंती केल्याने त्यांनी त्यांस सहमती दर्शवली व सोबत पंचनामा करणे कामी लॅपटॉप व प्रिंटर घेतलेचे सांगितले.
पोलीसस्टाफ व दोन पंच अस ेखासगी वाहनाने निघून बातमीतील नमुद ठिकाणी सुभेदार गल्ली, झेंडीगेट येथे सुभेदार मज्जीदच्या पाठीमागे बंदीस्त रुममध्ये जावुन खात्री केली असता तेथे एक इसम गोवंशीय जातीच्या जनावरांची कत्तल करतांना दिसला. आमची व पंचाची खात्री पटताच ठिक 03/15 वा. छापा टाकुन सदर इसमास ताब्यात घेवून त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव रिझवान जमीर कुरेशी वय 30 वर्षे रा सुभादार गल्ली, अहमदनगर असे असल्याचे सांगितले. सदर ठिकाणची पाहणी केली असता त्याठिकाणी गोवंशीय मांस व साहित्य मिळून आले.
कत्तल करण्यासाठी लागणारे साहित्य एक सुरा, वजनकाटा, चाकू, लाकडी ठोकळा असे साहित्य किअं 1,92500/-एकुण वरील वर्णनाच्या गोमांस मिळुन आल्यानेपोहेक्/440 संदीप पवार यांनी लागलीच मा. पशुवैद्यकिय अधिकारी अ.नगर, यांना पत्र देवुन बोलावुन घेवुन सदर ठिकाणी मिळालेले गोमासांचे तुकडे गोवंशीय आहे अगर कसे यांची पडताळणीकरणेकरीता पशुवैदयकिय अधिकारी यांनी सदर मांसामधून अंदाजे 200 ग्राम वजनाचे मांस हे गोवंशीय अगर म्हैसवर्गीय आहे अगर कसे?यांचे परिक्षणहोणेकरीता राखून ठेवून ते पंचासमक्ष सिलबंद करुन केला मिळालेला मुददेमाल पोहेक/440 संदीप पवार यांनी जागीच जप्त करुन त्याबाबत त्यांनी सविस्तर पंचनामा केला आहे.

No comments:

Post a Comment