न्यायालयाने बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

न्यायालयाने बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला.

 न्यायालयाने बाळ बोठेचा जामीन अर्ज फेटाळला.

अहमदनगर - रेखा जरे हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याचा जामीन काल जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. पत्रकार बाळ बोठेचा विनयभंग गुन्ह्यातील जामीन. नगर मधील एका महिला सामाजिक कार्यकर्त्याच्या सुनेच्याच्या तक्रारीवरून पत्रकार बाळ बोठे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणात बाळ जगन्नाथ बोठे याने जामीन मागितला होता.त्यासाठीच त्याने नगर जिल्हा न्यायालयात वकीला मार्फत जामीन अर्ज दाखल केलेला होता. यावर 18 फेब्रुवारी रोजी न्यायालयाने निर्णय देत बोठेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. भादवि कलम 354, 354ऊ कोतवाली पोलिस स्टेशन. जिल्हा न्यायाधीश क्रमांक दोन सरकारी पक्षाच्या वतीने एडवोकेट एस के पाटील व मूळ फिर्यादीच्या वतीने एडवोकेट सचिन पटेकर यांनी कामकाज पाहिले तसेच आरोपीच्या वतीने एडवोकेट तवले यांनी काम पाहिले.

No comments:

Post a Comment