छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आज सायंकाळी ‘दिपोत्सव’ कृतज्ञता सोहळा. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Friday, February 18, 2022

छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आज सायंकाळी ‘दिपोत्सव’ कृतज्ञता सोहळा.

 छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने आज सायंकाळी ‘दिपोत्सव’ कृतज्ञता सोहळा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः शिवजयंतीची सुरवात करणार्‍या शिवजयंतीचे जनक असलेल्या क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुलें प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अहमदनगर शहरात शिवजयंतीच्या पुर्वसंध्येला माळीवाडा फुले स्मारक येथे ’दीपोत्सव’ कृतज्ञता सोहळयाचे आयोजन करण्यात येत असते. यंदाचा सोहळा आज दि. 18 फेब्रुवारी 2022 रोजी सायं. ठीक 7:30 वाजता होणार असुन स्थळ  महात्मा ज्योतिबा फुले स्मारक, माळीवाडा वेश, अहमदनगर येथे दीपोत्सवास सर्व शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन छत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने अ‍ॅड. गजेंद्र दांगट यांनी केलेले आहे.
येथील छत्रपती प्रतिष्ठान आयोजित ’दीपोत्सव’ या कृतज्ञता सोहळ्याचे यंदाचे 6 वे वर्ष आहे. सहा वर्षांपुर्वी अ‍ॅड. गजेंद्र दांगट आणि सहकारी यांनी अहमदनगर शहरातील माळीवाडा भागातील महात्मा जोतीराव फुले स्मारक येथे दीपोत्सवाची सुरूवात केली. देशातील पहिली शिवजयंती महात्मा जोतीराव फुले यांनी सुरू केली होती. त्याबाबत त्यांनी स्वत:च लिहून ठेवलेले होते. देशातील स्त्रीया, शेतकरी व सामान्य माणसांची दैन्यावस्था दूर करण्यासाठी त्यांनी व सावित्रीमाई फुले यांनी आपले संपुर्ण आयुष्य वाहीले. हि दैन्यावस्था दूर करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हा मोठा आदर्श होऊ शकतो म्हणून ते शिवरायांची विस्मरणात गेलेली समाधी शोधण्यासाठी त्याकाळी काहीही सोयी नसताना थेट रायगडावर गेले. तेथे काटवनात समाधी शोधली व त्यावर फुले वाहून शिवजयंती साजरी केली. त्यावेळी स्थानिक ग्रामभटाने त्यांपैकी विरोध केल्याचे त्यांनी नोंदवुन ठेवलेले आहे.

No comments:

Post a Comment