स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मोटरसायकल चोरणारा गजाआड. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Friday, February 18, 2022

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मोटरसायकल चोरणारा गजाआड.

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; मोटरसायकल चोरणारा गजाआड.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गजानन बाबुराव सोनवणे रा.श्रीरामपूर या मोटारसायकल चोराला स्थानिक गुन्हे शाखेने राहता परिसरात अटक करून चोरी गेलेली मोटारसायकल जप्त केली आहे. 30 हजार रुपये किंमतीची होंडा कंपनीची मोटार सायकल अज्ञात चोरट्याने साकुरी शिवारातील साईपार्क, डी बिल्डींग, येथून चोरी नेल्याची तक्रार प्रकाश एकनाथ कदम यांनी राहाता पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. या तक्रारीनुसार भादविक 379 प्रमाणे गुन्हा राहता पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असताना हा गुन्हा गजानन सोनवणे याने केला असल्याची माहिती पोनि. अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली. या माहितीनुसार पथकातील पोसई / सोपान गोरे, पोहेकॉ/ दत्तात्रय हिंगडे, पोना/ विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरदंले, दिपक शिंदे, देवेंद्र शेलार, पोकॉ/ राहुल सोळुंके, विजय धनेधर चापोहेकॉ/बबन बेरड अशांनी आरोपीचा राहाता परीसरात शोध घेवुन आरोपीस अटक केली आहे.  त्याचाकडून गुन्हयाबाबत कसुन चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हया केल्याची कबुली देवुन गुन्हयातील चोरलेली मोटार सायकल समक्ष हजर केल्याने ती जप्त करुन ताब्यातील आरोपी व मुद्देमाल राहाता पोस्टे येथे समक्ष हजर केला. पुढील कारवाई राहाता पोस्टे.करीत आहे.सदरची कारवाई ही मनोज पाटील पोलीस अधीक्षक, स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर व श्री. संजय सातव उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग,यांचे सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here