शैक्षणिक संस्थांचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 10, 2022

शैक्षणिक संस्थांचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील.

 शैक्षणिक संस्थांचे नियम सर्वांनी पाळले पाहिजेत-गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील.

हिजाबवरुन राजकीय फायद्यासाठी आंदोलन न करण्याचे गृहमंत्र्याचे आवाहन; दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पुण्यात घोषणाबाजी.


मुंबई -
महाराष्ट्रात मालेगावसह पुण्यात हिजाबच्या समर्थनात आंदोलन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दुसर्‍या राज्यातील घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन न करणे योग्य नसल्याचे म्हटले असून आपण शाळेत, कॉलेजमध्ये जातो तेव्हा शिक्षणालाच प्राधान्य दिले पाहिजे. शैक्षणिक संस्थाचे जे नियम असतील ते सर्वांनी पाळले पाहिजेत. असं आवाहन केलं आहे.
कर्नाटकातील अनेक भागांमध्ये हिजाबच्या वादाने पेट घेतल्यानंतर सरकारने उच्च माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये तीन दिवस बंद राहतील असा आदेश जारी केला आहे. त्यानंतर या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले आहेत. महाराष्ट्रापासून पश्चिम बंगाल पर्यंत हिजाब घालू देण्याच्या मागणीचे समर्थन करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. माझी सगळ्यांना विनंती आहे की दुसर्‍या राज्यामध्ये घडणर्‍या एखाद्या घटनेवरुन महाराष्ट्रात आंदोलन करुन समाजात अशांतता निर्माण करणे राज्याच्या हिताचे नाही. राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलन करणे योग्य नाही. मी सर्वांना आवाहन करतो की शांतता ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यावरुन आंदोलन करण्यात येत आहे. कर्नाटकमध्ये मुस्लिम समुदायाच्या मुलींना हिजाब वापरण्यास बंदी घालणार्‍या कर्नाटक भाजपा सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महात्मा फुलेवाडा येथे निषेध आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी आहेत. यावेळी केंद्र सरकार विरोधात घोषणा आल्या. दरम्यान, बंगळुरुतील शाळा, महाविद्यालये आणि अन्य शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशद्वारापासून 200 मीटरच्या आवारात आंदोलनास पोलिसांनी बंदी घातली आहे. दोन आठवडे ही बंदी लागू राहील़ हिजाब प्रकरण चिघळल्याने राज्यातील शाळा-महाविद्यालये तीन दिवस बंद असून, बहुतांश ठिकाणी ऑनलाइन वर्ग सुरु आहेत.

No comments:

Post a Comment