हिजाब घालणार्‍या मुलींना शिक्षण नाकारणार्‍या कर्नाटक सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Thursday, February 10, 2022

हिजाब घालणार्‍या मुलींना शिक्षण नाकारणार्‍या कर्नाटक सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध.

 हिजाब घालणार्‍या मुलींना शिक्षण नाकारणार्‍या कर्नाटक सरकारचा राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून निषेध.

कर्नाटकमधील समाजकंटकांवर कारवाई करा.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः महाराष्ट्र राज्य हे छत्रपति शिवाजी महाराज यांचे राज्य असून महाराष्ट्र राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्त्रियांना पहिल्यापासून संरक्षण दिलेले आहेत तसेच एके ठिकाणी सरकार हे बेटी पढाव बेटी बचाव हा नारा देत आहे. परंतु दुसरे ठिकाणी एक स्त्री बघून कर्नाटकमध्ये शंभर ते दोनशे समाजकंटक त्या मुलीला बुरख्यात हिजाब वर पाहून घोषणाबाजी देत आहे. ही आपली भारतीय संस्कृती नाही तरी अशा समाज कंटकांवर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद यांनी केली असून या घटनेचा निषेध करत जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
कर्नाटक या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या महिलांचा पेहरावा  हिजाब (हेड स्कार्फ बुरखा) याला काही समाजकंटक विरोध करून मोठ्या प्रमाणे जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुस्लिम समाजाच्या महिलांचा पेहरावा हिजाब (हेड स्कार्फ बुरखा) यास कर्नाटक राज्य मधील समाजकंटक विरोध करीत आहे  हिजाब मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे इस्लाम धर्मात मुली व महिलांना अत्यावश्यक असून अनेक पिढ्यांपासून मुस्लिम मुलगी व महिला हिजाब (बुरखा) परिधान करून शाळेत व महाविद्यालयात देखील जात आहे आजपर्यंत कोणतेही शाळा व विद्यालयांमध्ये हिजाब घालून आलेल्या मुलींना कधीही शाळेमध्ये येण्यास नाकरण्यात आलेले नाही तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 ते 28 मध्ये देशातील सर्व नागरिकांना त्यांच्या धर्माचे स्वतंत्र दिले आहे तसेच भारतीय राज्यघटनेच्या कलम 19 (1)(अ) अन्वे सर्वांना बोलण्याचे व राहण्याचे स्वातंत्र्य दिलेले आहे तसेच स्वातंत्र्य भारतात आपल्या स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत कुणीही कोणाला कोणते गणवेश घालावे हे कुणीही सांगितलेले नाही किंवा कोणतेही धर्माचे लोकांनी जे काही गणवेश घातलेले आहे त्याच कधीही विरोध केलेला नाही परंतु कर्नाटकात मागील काही दिवसापासून संविधानाने दिलेल्या मौलिक अधिकारापासून सामान्य जनतेला विशेष मुलींना वंचित ठेवण्याचे काम केले जात आहे.
कर्नाटक सरकारचे बेकायदेशीर व भारतीय राज्य घटनेच्या विरोधात जाऊन अशा कृत्यामुळे पूर्ण भारतात तसेच महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यामुळे जातीय दंगली घडतील तरी महाराष्ट्रात तसेच अहमदनगर या ठिकाणी सध्या शाळा व कॉलेज सुरू करण्यात आले आहे तसेच 10 वी व 12 वीचे पेपर हे ऑफलाइन पद्धतीने होणार असून कर्नाटकाचे सावट हे अहमदनगर येथे होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरिता प्रत्येक शाळेत अथवा कॉलेजमध्ये पोलीस बंदोबस्त देण्यात यावे व असे काही कृत्य घडू नये याची दक्षता घेण्यात यावी तसेच प्रत्येकाला आपल्या जातीय धर्माचा अभिमान असावा कोणत्याही धर्माचा तिरस्कार नसावा कोणत्याही जाती धर्माची इस्त्रीची आपली जबाबदारी आहे तिचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद समवेत नूर शेख, वसीम पठाण, जावेद हाजी, आसिफ शेख, शादाब हाफीस, कादीर शेख, अतीक शेख, नईम शेख, फिरोज शेख, शहानवाज काझी, जुबेर शेख, आजूशेख, शादाब शेख आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here