परिसरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आ. संग्राम जगतापांचे आश्वासन. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Responsive Ads Here

Tuesday, February 1, 2022

परिसरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आ. संग्राम जगतापांचे आश्वासन.

 परिसरातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे आ. संग्राम जगतापांचे आश्वासन.

किर्लोस्कर कॉलनीतील नागरी समस्यांची पाहणी.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः गुलमोहर रोड किलोस्कर कॉलनी परिसरामध्ये मोठ्या नागरी वसाहती निर्माण झाल्या आहेत.आजही येथे नागरिक मूलभूत प्रश्न पासून वंचित आहेत त्यांना  नागरी सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. आज या परिसरातील नागरिकांचे विकास कामे समजावून घेतले आहे लवकरच टप्प्याटप्प्याने सर्व प्रश्न मार्गी लावू शहरातील नागरिकांनी आता चिंता करायची गरज नाही मी तुमचे प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावत आहे. शहरी विकासाचे अनेक वर्षाचे मूलभूत प्रश्न प्रलंबित होते ते  सोडवण्याचे काम सुरू आहे. किर्लोस्कर कॉलनी परिसरातील सर्व विकासाचे प्रश्न मार्गी लावू मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी सुचवलेले प्र.क्र.4 मधील सर्व विकास कामे मार्गी लावले आहे. शहरातील रस्त्यांची विकास कामे हाती घेतली असून गुलमोहर रोड, पाईपलाईन रोड, शीला विहार रोड, तारकपूर रोड, या रस्त्याची कामे ही आता सुरू होणार आहेत. असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. प्र.क्र.4 मधील किर्लोस्कर कॉलनी परिसरातील नागरि समस्या ची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधताना आमदार संग्राम जगताप,मा. नगरसेवक अजिंक्य बोरकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम,शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि.मनोज पारखी आदीसह विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अजिंक्य बोरकर म्हणाले की गुलमोहर रोड किर्लोस्कर कॉलनी परिसरातील विविध प्रश्न प्रलंबित आहे ती प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी पाहणी केली आहे. लवकरच टप्प्या-टप्प्याने सर्व प्रश्न मार्गी लागले जातील असे आश्वासन नागरिकांना दिले.
यावेळी नगरसेवक अजिंक्य बोरकर, पाणीपुरवठा विभाग प्रमुख परिमल निकम,शहर अभियंता सुरेश इथापे, इंजि.मनोज पारखी आदीसह विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Responsive Ads Here