चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन चोरणारे आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Tuesday, February 1, 2022

चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन चोरणारे आरोपी जेरबंद.

 चाकूचा धाक दाखवून सोन्याची चेन चोरणारे आरोपी जेरबंद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः सुपा पोलिस स्टेशन हद्दीमधील पारनेर तालुक्यातील वाडेगव्हाण येथे शेतातील महिलेला चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सोन्याची साखळी ओरबाडून घेणार्‍या दोघा आरोपींना सुपा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डॉ.नितीनकुमार गोकावे यांच्या पथकाने अटक करून मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सुपा पोलीस स्टेशन ता.पारनेर जि.अहमदनगर येथे फिर्यादी नामे रामदास ठकाजी शेळके यांनी फिर्याद दिली की फिर्यादीची आई रखमाबाई ठकाजी शेळके वय 94 रा . वाडेगव्हाण शिवार पारनेर फाटा ता.पारनेर ही घराजवळ पारनेर फाटा ते पारनेर जाणारे रोडलगत मकाचे पिकाजवळील पडीक शेतात शेळी चारत असताना एक अनोळखी इसम वय अंदाजे 30 ते 35 शरीराने मजबुत अंगात काळें रंगाचे कपडे घातलेला याने येवून फिर्यादीचे चे आईस चाकुचा धाक दाखवुन आईच्या गळयातील 30,000 / - रू.कि.ची गळयातील सोन्याची सुमारे दोन तोळे वजनाची पोत बळजबरीने हिसकावुन घेवून तिला जोराचा धक्का देवून रोडच्या दिशेने पळत जावून रोडवर काळया रंगाची मोटार सायकल घेवून उभा असलेल्या अनोळखी इसमाकडे पळत जावून ते दोघेजण मोटार सायकलवर बसुन पारनेर फाटयाकडे (हायवे रोडकडे) सुसाट वेगात निघुन गेले आहेत . वगैरे म.चे फि.वरून सुपा पोस्टे गुरन 09/2022 भादवि 392,34 प्रमाणे दोन अनोळखी इसमाविरुदध गुन्हा रजि . दाखल करण्यात आला होता . सदरचा गुन्हा हा तपासाधिन असताना यातील आरोपी नामे 1 )  शाहरूख सलीम खान वय 22 वर्षे रा.मुरली कदम याचे भाडोत्री खोलीत विवांत बिल्डींग ता.हवेली जि.पुणे मुळ रा.मुरूड ता.जि.लातुर 2 ) हरीश किसन कोळपे वय 21 रा. वाडेबोल्हाई ता . हवेली जि . पुणे मुळ रा.लोणी काळभोर ता . हवेली जि.पुणे यांचा शोध घेवून त्यांना  गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन सदर आरोपीकडे पोलीस कस्टडी दरम्यान सखोल व बारकाईने तपास केला असता आरोपी नामे हरीश किसन कोळपे याने गुन्हयातील चोरलेले सोने व वापरलेला चाकु हा त्याचा साथीदार शाहरुख खान याचे मदतीने वाडेबोल्हाई ता . हवेली जि . पुणे येथील राहते घरी लपवुन ठेवला आहे अशी कबुली दिल्याने गुन्हयातील चोरी केलेले 25,000 रु किचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरेलेला चाकु हस्तगत करण्यात आलेला आहे . दि .31 / 01 / 2022 वरील गुन्हयातील तपासाची कामगिरी पोलीस अधिक्षक मनोज पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल,पोलीस उपअधिक्षक अजित पाटील, पोलीस निरीक्षक डॉ.नितीनकुमार गोकावे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम पवार, सहाय्यक फौजदार सुनिल कुटे ,पोना कल्याण लगड , पोना यशवंत ठोंबरे यांनी केली पुढील तपास पोलीस नाईक यशवंत ठोंबरे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment