माजी ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Saturday, February 19, 2022

माजी ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या.

 माजी ग्रामपंचायत सदस्याची आत्महत्या.

निंबळकच्या उपसरपंचावर गुन्हा दाखल.

नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः उसनवार दिलेले चार लाख रुपये निंबळकचे उपसरपंच बाळासाहेब कोतकर यांना वेळोवेळी मागणी करूनही न दिल्यामुळे  माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश कोतकर यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येस कारणीभूत असल्याप्रकरी संदीप कोतकर यांनी बाळासाहेब कोतकर यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे.
संदीप कोतकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. गणेश याने आठ महिन्यापूर्वी  बाळासाहेब कोतकर यांना आठ दिवसाच्या बोलीवर हॉटेल सार्थक येथे राजेंद्र कोतकर व सदाशिव रोहकले यांच्या समक्ष चार लाख रुपये उसनवारीवर दिले होते. मयत गणेश यांनी वेळोवेळी कोतकर यांना पैसे मागुन ही दिले नाही. बाळासाहेब कोतकर यांना पैसे दिल्याबाबत विचारणा केली असता पैसे घेतले असल्याचे कबूल केले.मी चार दिवसानी देणार असल्याचे मला सांगीतले.
माझा भाऊ गणेश हा कोतकर यांच्याकडे  वेळोवेळी पैसे मागतच होता. परंतु कोतकर यांनी काही ना काही कारण सांगुन पैसे देण्यास टाळा टाळ करत होता. माझा भाऊ गणेश हा काही दिवसां पासुन टेन्शनमध्ये आहे.तो जिवाचे काही बरे वाईट करून घेईल तुम्ही त्यांचे घेतलेल चार लाख रुपये परत देऊन टाका. त्याचे कुटुंब ताणतणावाखाली आहे. असे मी  कोतकर ला होते. पैसे देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे गणेश यांनी विषारी औषध घेतले. उपचारासाठी नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डक्टरांनी त्यास गणेश हा मयत झाल्याचे आम्हाला सांगीतले. या बाबत एमआय डीसी पोलीस स्टेशन मध्ये कोतकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment