जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने जामखेड येथे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Monday, February 7, 2022

जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने जामखेड येथे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली

 जैन कॉन्फरन्स आणि कोठारी प्रतिष्ठानच्या वतीने जामखेड येथे लता मंगेशकर यांना श्रद्धांजली.


जामखेड ।
लता मंगेशकर यांनी जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश तर हळहळलाच परंतु जगातील त्यांचे चाहते सुद्धा  दुखी झाले आहेत. असे प्रतिपादन शिवनेरी अकॅडमी चे लक्ष्मण भोरे यांनी केले, यावेळी बोलताना भोरे म्हणाले लतादीदींनी १९६३ साली २६ जानेवारी रोजी" ए मेरे वतन के लोगो" हे गाणे म्हटले होते त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना सुद्धा गाने ऐकून त्याना भरून आले होते अशी गाणकोकिळा पुन्हा होणे नाही त्यांचा आवाज चिरकाल स्मरणात राहणार आहे.
यावेळी जैन कॉन्फरन्स चे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य संजय कोठारी म्हणाले लतादीदींना आज आम्ही जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि कोठारी प्रतिष्ठान जामखेड मार्फत श्रद्धांजली वाहत आहोत. लतादीदींची दुःखद निधनाची बातमी एकताच खूप वाईट वाटले. परंतु लतादीदींचं नाव त्यांच्या गीतांच्या माध्यमातून कायम जीवंत राहणार आहे.
आय सी आय सी बँकेचे गणेश देवकाते, लक्ष्मणराव भोरे, सुनील जगताप ,अरुण लटके , प्रफुल्ल सोळंकी ,प्रशांत राखेचा उपस्थित होते.

No comments:

Post a Comment