खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद. - Nagari Davandi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates

Breaking

Post Top Ad

Thursday, February 24, 2022

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद.

 स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जेरबंद.


नगरी दवंडी/प्रिंतनिधी
अहमदनगर ः
माया वसंत क्षिरसाठ वय 35 रा.भास्कर कॉलनी लालटाकी अहमदनगर यांच्या सासु यांची भांडणातून हत्या करणारा फरार आरोपी संतोष भास्कर वय 41 रा.लालटाकी अहमदनगर यास पाथर्डी येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
सदर घटनेची हकीकत अशी की, माया वसंत क्षिरसाठ यांची बहीण भारती दिपक आव्हाड रा.पाथर्डी व खरेदी यांच्या शेजारी राहणारे सारीका संतोष भारस्कर यांचे नातेवाईकांचे  पाथर्डी येथे भांडणे झाले होते.त्या कारणावरून दि.10/4/2019 रोजी दुपारच्या वेळी सारीका संतोष भारस्कर व त्यांचे नातेवाईक विक्रम लहानु दिनकर, मुकेश विष्णू दिनकर व इतर चौदा ते पंधरा आरोपींनी फिर्यादी माया शिरसाट यांना तसेच त्यांची सासु बेबी अर्जुन शिरसाठ दिर सचिन शिरसाठ,विनोद शिरसाठ, संतोष शिरसाठ व इतर नातेवाईकांना लाकडी दांडके, चाकु ,तलवारी या हत्यारांनी मारहाण करून जखमी करून फिर्यादी यांची सासू बेबी अर्जुन शिरसाठ यांची हत्या केली होती.
या घटनेबाबत फिर्यादी यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून गुरनं599/2019,भादवि कलम 302,143,147,148,149,307,504,506, सह भाहकाक 4/25 सह मपोकाक 31(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे एकूण 19 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.पोलीस अधीक्षक मनोज पाटील  यांनी जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना आदेश दिले होते पोलीस अंमलदार यांचे स्वतंत्र पथकाची नेमणूक करून पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत सूचना व मार्गदर्शन केले असता नमूद सूचना प्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेतील पथकातील अंमलदार व पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस निरीक्षक श्री.अनिल कटके स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना गुप्त बातमी दारा मार्फत आरोपी नामे संतोष भारस्कर हा पाथर्डी येथे आले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक कटके यांनी मिळालेल्या बातमतील आरोपीचे खात्री करून कारवाई करणे बाबत सूचना दिल्या.
पथकातील सफौ.राजेंद्र वाघ,संजय खंडागळे,पोलीस हेडकॉन्स्टेबल बापूसाहेब फौलाने, पोलीस नाईक भीमराज खडसे, देवेंद्र शेलार,यांनी मिळून बातमीतील नमूद ठिकाणी जाऊन आरोपीचे ठिकाण बाबत माहिती घेऊन आरोपीस शिताफीने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव संतोष बबन बारस्कर वय 41 राहणार लालटाकी अहमदनगर असे सांगितले त्याच्याकडे नमूद गुन्ह्यातील चौकशी केली असता तर तो सुरुवातीचा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला त्याला अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने नमूद गुन्हा केल्याची कबुली  दिल्याने त्यास ताब्यात देऊन तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे पुढील कारवाई तोफखाना पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री. मनोज पाटील पोलीस अधीक्षक अहमदनगर, श्री सौरभकुमार अग्रवाल अप्पर पोलिस अधीक्षक अहमदनगर व श्री.अजित कातकडे  उपविभागीय पोलिस अधिकारी नगर शहर विभाग अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment